राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Thursday, October 26, 2023

*प्राईड ॲकेडमी आणी डॉ.मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ. वंदनाताई ज्ञानेश्वर मुरकुटे संचलित प्राईड अकॅडमी भेर्डापूर, एल.पी.जी. ग्रुप भेर्डापूर ता.श्रीरामपूर तसेच शाकुंतल मेडिकल एज्युकेशन अँड रुलर डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट संचलित राहाता येथील डॉ.मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या भव्य मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९. ते ४ वाजता प्राईड अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज भेर्डापूर -वांगी रोड, वांगी ता. श्रीरामपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राईड अकॅडमीच्या डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी दिली. 
या शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना ८५० आजारांसाठी मोफत वैद्यकीय सेवा लाभ मिळणार असून सर्वसामान्यांना या योजनेचा लाभ व्हावा या उद्देशाने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. नगर जिल्ह्यात तीनच ठिकाणी या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यात येत असून डॉ. मैड स्पेशलिटी हॉस्पिटल, राहाता यांच्या वतीने ही सेवा देण्यात येणार आहे. याठिकाणी प्रसिद्ध स्रीरोग तज्ञ डॉ. संतोष मैड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय पटेल ,डॉ. पारितोष कांबळे, डॉ. धर्मवीर सहाने ,डॉ. चंद्रकांत सानप डॉ. आशुतोष मैड, डॉ. शिवानी मैड, आदी वैद्यकीय सेवेतील तज्ञ डॉक्टरच्या अधिपत्याखाली हे मोफत सर्व रोग निदान शिबिर पार पडणार आहे. तरी पंचक्रोशीतील गावातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा व सोबत येताना आपले पिवळे ,केशरी रेशन कार्ड व आधार कार्ड सोबत आणावे असे आवाहन यावेळी प्राईड अकॅडमीच्या संस्थापिका तथा मा. सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी केले आहे.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ)
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



No comments:

Post a Comment