श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
अशोक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील कारेगांव भाग शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीने ऊस तोडणी गाडीवान व मजुरांची अपघाती विमा उतरविला आहे. चाळीसगांव भागातील ऊसतोडणी गाडीवान बापू दशरथ गायकवाड यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांचा तिन लाखाचा अपघाती विमा क्लेम मंजूर झाला.सदर मंजूर तीन लाख रकमेचा धनादेश कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांचे हस्ते वारस पत्नी श्रीमती बेबाबाई बापू गायकवाड यांना सुपूर्द करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर २०१९-२० चे गाळप हंगामात चाळीसगांव येथील बापू दशरथ गायकवाड हे ऊस तोडणीसाठी आले होते, त्यावेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. कारेगांव भाग कंपनीने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता विमा कंपनीकडे केली होती. त्यावर विमा कंपनीने रुपये तीन लाख रकमेचा क्लेम मंजूर केला आहे.
त्या रकमेचा धनादेश कै.बापू दशरथ गायकवाड यांच्या
वारसपत्नी श्रीमती बेबाबाई बापू गायकवाड यांना सुपूर्द करण्यात आला.
याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, कारेगांव भाग संस्थेचे मॅनेजर ज्ञानेश्वर बडाख,अशोक राऊत, गणेश लेलकर, योगेश लेलकर गाडीवान कंत्राटदार हिरामण रुपला पाटील आदी उपस्थित होते.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख*
( *सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ)
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment