💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
श्रीरामपूर येथील दोस्ती फाऊंडेशनच्यावतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देणे आणि भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम साहेब यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून श्रीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात राज्यस्तरीय पुरस्कार वितरण स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि राज्यस्तरीय काव्यसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानिमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक ,ग्रामीण कथाकार, लेखक मिराबक्ष बागवान अध्यक्षपदावरून बोलत होते. दोस्ती फाऊंडेशनतर्फे नाशिक जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश अहिरे यांना उत्कृष्ट प्रशासक अधीकारी, चाळीसगांव पंचायत समितीच्या शिक्षिका शारदा भामरे यांना आदर्श शिक्षिका,आणि जळगांव परिवहन आगाराच्या यशोदा पांढरे यांना उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार देण्यात आला.
जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेतील लहान गट (५ वी ते ७ वी),प्रथम क्रमांक -- मनोज नवनाथ फसले ,जिल्हा परिषद शाळा ,बाबुर्डी घुमट ता.नगर
द्वितीय क्रमांक -- कु.प्रबोधिनी पठाडे ,श्रीनाथ विद्या मंदिर अहमदनगर
तृतीय क्रमांक (विभागुण) -- ऋतुपर्ण राहुल गायकवाड,स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूल संगमनेर आणि कु.श्रावणी राहुल आल्हाट,जिल्हा परिषद शाळा सूतगिरणी
उत्तेजनार्थ- विद्या सातपुते,जिल्हा परिषद शाळा सुकेवाडी संगमनेर
,मध्यम गट (८ वी ते १० वी) प्रथम क्रमांक --कु.सायली राजेंद्र उंडे,न्यू इंग्लिश स्कूल वाळकी ता.नगर
द्वितीय क्रमांक -- कु.श्रद्धा साळवी , महात्मा फुले विद्यालय घुलेवाडी संगमनेर
,मोठा गट (११ वी ते पदवीधर , प्रथम क्रमांक -कु.सानिया राजेंद्र भालेराव (बी.ई) कोपरगाव, द्वितीय क्रमांक --रघुनाथ ठोंबरे (पदवीधर) तांदळी ता.नगर या विजेत्यांना रविवार दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,भेटवस्तू, पुस्तक संच, पुष्पगुच्छ आणि स्नेहवस्त्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यीक मिराबक्ष बागवान,प्रकाश आहिरे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नाशिक, दैनिक राष्ट्र सह्याद्री चे संपादक करण नवले,सामाजिक कार्यकर्ते फ्रान्सिस संसारे,आर पी आय जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन,माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे,युवाक्रांती पोलीसमित्र संघटना अध्यक्ष सुनीता वाळुंज, ज्येष्ठ कवयित्री कल्पना निंबोकार, शब्दगंध सचिव सुनील गोसावी, प्रसिद्ध कवयित्री संध्याराणी कोल्हे,भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे,ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल घाडी, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. राज्यभरातून आलेल्या सत्तर कविकवयित्रीनी आपल्या वैचारिक, भावनिक आणि चिंतन करणाऱ्या काव्यरचना सादर करण्यात आल्या.कार्यक्रमात सर्व मान्यवरांना शाल,सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष रज्जाकभाई शेख, नितीन गायके,नसीर सय्यद, देविदास बुधवंत, सत्तारभाई शेख,आनंदा साळवे,इमाम सय्यद,अमोलभाऊ शिंदे,गौतम गायकवाड, बाबासाहेब पवार, राजेंद्र देसाई यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशोदा पांढरे यांनी केले तर आभार नसीर सय्यद यांनी आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क श्रीरामपूर -श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment