राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, October 20, 2023

*'माझी माती माझा देश' अभियानामुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना - अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी*🌹🥀🌺🌷🌸🙏❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यात 'माझी माती माझा देश' हे अभियान अतिशय चांगल्याप्रकारे राबविण्यात आले असून या अभियानांमुळे नागरिकांमध्ये एकतेची भावना निर्माण होत आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहा आयोजित 'माझी माती माझा देश' अमृत कलश जिल्‍हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्‍याच्‍या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, नगर पालिकेचे सहायक आयुक्त प्रशांत खांडकेकर, मनपाचे उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, तहसीलदार शिल्पा पाटील, नेहरू युवा केंद्राचे शिवाजी खरात आदी उपस्थित होते.

सुहास मापारी म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राबविण्यात आलेल्या 'माझी माती माझा देश' या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावात, प्रभागात विविध कार्यक्रम आयोजित करून अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. नागरिकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. या ठिकाणी संकलित झालेले अमृत कलश मुंबई येथे व तेथून राजधानी दिल्लीला एकत्रित होणार असून त्या ठिकाणी अमृत वाटिका साकारण्यात येणार आहे. या कार्यक्रमातून जनमानसमध्ये एक नवचैतन्य निर्माण होऊन एकतेचा संदेश यातून दिला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच क्षेत्रातून आणि सर्व गावात अमृत कलश संकलित करण्यात आले. यावेळी संकलित झालेल्या कलशांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. नगरपरिषद, नगरपंचायत तसेच महानगरपालिकेच्या कलशांचे एकत्रिकरण करण्यात येऊन अमृत कलश अपर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळालीप्रवरा नगरपरिषदेचे सहायक प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी यांनी केले तर शेवटी तर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी, विजय बडे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, मनपा चे शशिकांत नजान यांच्यासह जिल्हाभरातून आलेल्या नगर परिषदांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -
*9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment