💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता
नवरात्रोत्सवानिमित्त श्री शक्ती ग्रुपच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या दांडिया महोत्सवास महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. मा.नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व मा. नगराध्यक्षा राजश्रीताई ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच जिल्हा बँकेचे संचालक ,मा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री शक्ती ग्रुपच्या संस्थापिका, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस सौ.दिपालीताई ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या भव्य दांडिया महोत्सवास हजारोच्या संख्येने महिलांनी हजेरी लावत महिला रास दांडियाचा मनमुराद आनंद लुटला. श्री शक्ती ग्रुपच्या संस्थापिका सौ.दिपाली ससाणे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक अबालवृद्ध महिला भगिनींची उपस्थिती लाक्षणीय होती. यावेळी सौ ससाणे यांनी उपस्थित महिला भगिनींचे आभार मानले व सर्वांना धन्यवाद दिले. श्री शक्ती ग्रुपच्या वतीने नेहमीच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. महिला रास दांडियाचे हे सहावे वर्ष असून आजच्या धावपळीच्या जीवनात माता-भगिनी नेहमी आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त असतात. त्यामुळे नवरात्रोत्सवात दोन दिवस महिला भगिनींना आनंद लुटता यावा व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू समोर ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. महिला रास दांडियाच्या सर्वोत्तम सादरीकरणासाठी रोख तसेच, वस्तूंच्या रूपात भरपूर बक्षीसे व सन्मानचिन्हे देण्यात आली. आकर्षक रोषणाई, उत्कृष्ट संगीत व सुरक्षित वातावरण यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. श्री शक्ती ग्रुप च्या वतीने आयोजित दांडिया महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री शक्ती ग्रुपच्या अध्यक्षा माधुरी सोनवणे, उपाध्यक्षा पूजा मुंदडा, राजश्री वैद्य, श्री शक्ती ग्रुपच्या सर्व सदस्या, परीक्षक श्वेता कुंकूलोळ व अश्विनी परदेशी, सहेली ग्रुप, सर्व मा. नगरसेविका, श्रीरामपूर शहर काँग्रेस, व युवक काँग्रेसचे सर्व सहकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.
===================================
---------------------------------------------------
*सहयोगी*
पत्रकार राजू मिर्झा - श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment