राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, October 25, 2023

*लोकसेवा विकास आघाडीच्या दांडीया महोत्सव व महाआरतीला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग*💐🙏❤️ ✅ 🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि - वार्ता -
येथील माजी आ.भानुदास मुरकुटे व संस्थापक सिद्धार्थ मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली लोकसेवा विकास आघाडी व जिद्द फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली नवराञोत्सव निमित्त आयोजित दांडीया महोत्सव स्वराज्यरक्षक संभाजी मालिका फेम अभिनेञी प्राजक्ता गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वरिष्ठ विभागीय प्रबंधक, पुणे सौ. सुनीता भुरेवार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड व सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी महिलांमध्ये जावून दांडिया खेळाचा मनमुराद आनंद लुटला. तसेच नवरात्र उत्सव काळात दुर्गा अष्टमी निमित्त कटरा येथील मा वैष्णोदेवीचे मुख्य पुजारी सोनू पुजारी यांच्या शुभहस्ते भव्य महाआरती संपन्न होवून ढोल ताशाच्या वाद्य गजरात मिरवणूक काढण्यात आली.
            याप्रसंगी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड म्हणाल्या की, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे ह्या कौटुंबिक जबाबदारी व्यवस्थित सांभाळत असताना शैक्षणिक कार्याबरोबरच महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करुन आपले सामाजिक कर्तव्य पार यशस्वीपणे पार पाडत आहे. त्यांच्या कार्य कर्तृत्वाचा आपणास अभिमान असून त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास व भावी वाटचालीस मी शुभेच्छा देते, असे त्या म्हणाल्या.
           यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दांडीया स्पर्धेस उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद दिले. त्या म्हणाल्या की, अशोक उद्योग समूहाचे सूत्रधार माजी आ.भानुदास मुरकुटे यांची प्रेरणा व श्री.सिध्दार्थ मुरकुटे यांचे मार्गदर्शनावाखाली विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व धार्मिक उपक्रम राबविले जातात. यापुढील काळातही असे उपक्रम आयोजित केले जाणार असून त्यास श्रीरामपूरकरांचा असाच प्रतिसाद लाभावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
           सदरच्या दांडीया स्पर्धेत पेअर दांडिया छोटा गट रिद्धी पांडे, आरोही चौधरी (प्रथम) आर्वी वाघुंडे, सर्वश्री बनकर (व्दितिय) तर रूद्र घोरपडे, रुद्रानी गोसावी (तृतिय), मोठा गट विशाखा बालानी, खुशी बालानी (प्रथम) पूनम सोनी, चांदनी चायल (व्दितिय) सिमरन बालानी, वैशाली दळवी (तृतिय) तसेच ग्रूप दांडिया छोटा गट डेझलींग फिटरस (प्रथम) मोरया ग्रूप (व्दितिय) तर रास-ऑल स्टार्स (तृतिय) मोठा गट रासगोपिया (प्रथम) योग ग्रुप (व्दितिय), नवरंग ग्रुप (तृतिय) यांना रोख पारितोषिक व स्मृतचिन्ह देण्यात आले. 
           तर बेस्ट क्वीन ऑफ द नाईट प्रणाली अग्रवाल, वैशाली कुऱ्हाडे, वर्षा कोकडिया तर बेस्ट क्वीन ऑफ द सिल्वर दांडिया सोनिया गोयल यांना सोन्याची नथ व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. बेस्ट एक्स्प्रेशन ज्योती कुंभकर्ण, बेस्ट को ऑर्डीनेशन शिवानी बठेजा, भक्ती बठेजा इनोव्हेटिव्ह स्टेप आश्लेषा, बेस्ट आटायर माधुरी चौधरी, आर्वी चौधरी, बेस्ट मेकअप वैशाली करडकर यांना भेटवस्तू व स्मृतिचिन्ह देण्यात आले. लकी ड्रॉ विजेत्या अनिता सीताराम धामोणे, आसना प्रितेश कुंकुलोळ, वृषाली हुरुळे यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून १ लाख रुपयाचा विमा उतरविण्यात आला.
           या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नक्षत्र अकॅडमीचे राहुल उपाध्ये, झुंबा डान्स शिक्षक कावेरी मांडण, भरतनाट्यम विशारद आकांशा गर्जे, अकोले नृत्य मल्हार अकॅडमीचे आदित्य तंकवाल यांनी काम पाहिले. तसेच राज इव्हेंट मॅनेजमेंटचे इमदाद पठाण, इलियास पठाण, ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे प्रशासकीय अधिकारी सागर जावळे, लाईट सोनू पटारे, मंडप डेकोरेशन समीर शेख यांचे सहकार्य लाभले.
           यावेळी संस्थापक अध्यक्ष सिध्दार्थ मुरकुटे, स्वागताध्यक्ष सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, अध्यक्ष रोहन डावखर, कार्याध्यक्ष नाना पाटील, उत्सव प्रमुख गणेश सिंग राजपुत, उपाध्यक्ष भाऊसाहेब मुळे, प्रविण फरगडे, मनोज दिवे, विराज आंबेकर, सचिव विशाल धनवटे, ॲड्.उमेश लटमाळे, सहसचिव संजय कासलीवाल, नानासाहेब गांगड, खजिनदार संकेत संचेती, अमित कोलते, उत्सव समिती संदीप डावखर, वैभव सुरडकर, सांस्कृतिक अध्यक्ष रोहित मालकर, सौ.वैशाली सुकेकर, भगवान सोनवणे, सल्लागार नारायणराव डावखर, महिला समिती सौ.इंदुमती डावखर, सौ.शालिनी कोलते, सौ.ताराबाई आगरकर, सौ.पौर्णिमा पवार, सौ.मंदाकिनी मांढरे, सौ.लताताई धनवटे, सौ.सुनिताताई गायकवाड, सौ.संगिता शिंदे, सौ.दिपाली संचेती, सौ.अश्विनी दिवे, सौ.सुरेखा डहाळे व महिला भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. अध्यक्षीय सूचना मोना हिरे यांनी मांडली तर अनुमोदन सुरेखा मोरगे, प्रास्ताविक वैशाली सुकेकर, आभार प्रतिभा तागड यांनी मानले.

===================================
---------------------------------------------------
*सहयोगी:*
पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment