राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, November 5, 2023

*भोकरला सरपंच व 14 सदस्यांसाठी 73.07 टक्के मतदान*


*सरपंच व 14 सदस्यांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद, आज मतमोजणी*

*चंद्रकांत झुरंगे - भोकर*

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत निवडणुकीत काल झालेल्या मतदानात 73.07 टक्के मतदान झाले. येथे मुरकूटे-ससाणे विरूद्ध कानडे-ससाणे-विखे अशी सरळ लढत आहे. येथे सरपंच पदासाठी मुरकूटे ससाणे गटाकडून माजी सरपंच पुनम महेश पटारे विरूद्ध कानडे ससाणे विखे गटाकडून शितल प्रताप पटारे अशी लढत आहे. सरपंच पदासाठी व चौदा सदस्यांंचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले, आज मतमोजणी होत आहे. येथे लोकसेवा विकास आघाडी विरूद्ध परीवर्तन आघाडी अशी चुरशीची लढत झाली. प्रभाग पाच मध्ये सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. 
येथे सत्ताधारी माजी आमदार भानुदास मुरकूटे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे गटाच्या जगदंबामाता लोकसेवा विकास आघाडी विरूद्ध आमदार लहु कानडे व जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे व महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे गटाचा जगदंबा परीवर्तन आघाडी अशी लढत झाली. आज मतमोजणीनंतर येथे सत्ताधारी पुन्हा सत्तेवर विराजमान होणार की परीवर्तन होणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे. येथे असलेल्या 4962 मतदारांपैकील 3626 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक़्केवारी 73.07 इतकी झाली.
त्यात प्रभाग एक मध्ये 1030 मतदारांपैकी 788 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथील मतदान 76.50 टक्के झाले. प्रभाग दोन मध्ये 906 मतदारांपैकी 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक्केवारी 77.48 टक़्के झाली. प्रभाग तीन मध्ये 929 मतदारांपैकी 645 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने मतदानाची टक़्केवारी 69.42 टक़्के झाली. प्रभाग चार मध्ये 997 मतदारांपैकी 705 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे 70.71 टक्के मतदान झाले तर प्रभाग पाच मध्ये 1100 मतदारांपैकी 786 मतदारांनी मतदानाचा हक्क बाजावल्याने येथील मतदानाची टक़्केवारी 71.45 टक्के झाली. एकुण 4962 मतदारांपैकी 3626 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने येथे 73.07 टक़्के मतदान झाले.
  येथे सरपंच पदासाठी पुनम महेश पटारे व शितल प्रताप पटारे तर सदस्य पदासाठी माया तान्हाजी राक्षे, पुनम प्रतिक कांबळे, मयूर दत्तात्रय काळे, सोपान देवराम कोल्हे, हिराबाई मच्छींद्र खंडागळे, सविता सुदाम चौधरी, सिमा सुनिल विधाटे, संगीता लहानभाऊ विधाटे, हरीभाऊ भागवत पटारे, आप्पासाहेब दत्तात्रय जाधव नंदा सुरेश कर्जुले, संगीता बाळासाहेब अभंग, बबन विठ्ठल आहेर, सागर दत्तात्रय आहेर, गीरीष नारायण मते, राधाकीसन सिताराम विधाटे, सविता सुभाष आहेर, छाया दत्तात्रय आहेर, संदिप बापूसाहेब गांधले, ऋषीकेश बाळासाहेब झिने, मिना राजेंद्र आबुज, गीता भाऊसाहेब शेळके, निखील गणेश कांबळे, विजय पावलस अमोलीक, प्रिती सागर शिंदे, ज्योती वेणूनाथ डूकरे, काळू संजय गायकवाड, सम्राट सुरेश माळवदे रिंगनात असल्याने या उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे तर प्रभाग तीन मधून लोकसेवा आघाडीच्या संजीवनी ज्ञानेश्वर काळे ह्या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत.
काल पार पडलेल्या मतदान प्रक्रीयेत सकाळपासून दुपार पर्यंत मतदानाची गती अतिशय कमी होती परंतू दुपार नंतर मतदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी येथील सरपंच पदाचे दोनही उमेदवारांचे पतीराजांमध्ये झालेली किरकोळ बाचाबाची वगळता मतदान प्रक्रीया शांततेत पार पडली. दुपार नंतर झालेल्या गर्दीत प्रभाग चार व पाच मध्ये उशीरापर्यंत मतदान सुरू होते. त्यात प्रभाग पाच मध्ये सायंकाळी सव्वा सात वाजेपर्यंत मतदान सुरू होते. या मतदान प्रक्रीयेत तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.उपनिरीक्षक अतुल बोरसे, पोलीस हवालदार राजु त्रिभुवन, संतोश कराळे, संभाजी वारे व गृहरक्षक दलाने चोख बंदोबस्त ठेवला.

===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment