*बी.आर.चेडे - शिरसगांव*
मंगळवार दिनांक ७/११/२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता नेवासा तालुका शेतकरी संघटनेने अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने ऊस परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे ठिकाण लक्ष्मी मंगल कार्यालय , (पावन गणपती जवळ नेवासा फाटा ) तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथे आयोजित केली असून सदर असून परिषदेसाठी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य रघुनाथदादा पाटील व ऍड.अजित काळे राज्य उपाध्यक्ष यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.तसेच परिषदेसाठी भारत राष्ट्र समितीचे महाराष्ट्र प्रमुख माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, कालिदास आपेट कार्याध्यक्ष,क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेड चे प्रमुख शिवाजी नांदखिले,पश्चिम महाराष्ट्र प्रमुख एडवोकेट पांडुरंग रायते आदी मान्यवरांसह विविध जिल्हातील जिल्हाध्यक्ष प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांसह उपस्थित राहणार आहे.सदर परिषदेमध्ये उसाला एक रकमी पाच हजार रुपये प्रति. टन दर मिळावा, दोन साखर कारखाने व इथेनॉल प्रकल्प यामधील हवाई अंतराची अट रद्द करावी,केंद्र सरकारने साखर, कापूस, तेलाबिया, दूध कांदा आदी सर्व शेतमालावरील निर्यात बंदी उठवावी, पतसंस्था, फायनान्स कंपन्या , व्यापारी बँका आदि मुद्दलाच्या चार पटीने व्याज आकारणी व जप्तीच्या कारवाया करत असलेने त्यास प्रतिबंध करावा,अहमदनगर जिल्हा बँकेने राष्टीयकृत बँकेप्रमाणे एक रकमी कर्ज परतफेड योजना राबवावी. दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे २०२३-२४ साठी ऊस बिलातून सहकारी साखर कारखान्यांनी सेवा सोसायटीसह कुठल्याही वित्तीय संस्थेची सक्तीची कपात करू नये ,स्वर्गीय गोपीनाथ मुंडे विकास महामंडळाची दहा रुपये प्रति टनाची होत असलेली कपात रद्द करावी,उसाचे वजन खाजगी वजन काट्यावर करण्याची परवानगी मिळावी, त्याचप्रमाणे सर्व पक्षाच्या सर्व नेत्यांनी निवडणुकीत आपल्या जाहीरनाम्यात सातबारा कोरा संपूर्ण कर्जमाफी अशा आशयाचे प्रलोभने दाखवून शेतकऱ्यांना फसवून मते घेतली.सर्वच सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी बाबत फसवणूक केली आहे तरी तेलंगाणा प्रमाणे शेतकऱ्यांचे संपूर्ण शेती कर्ज माफ करून सातबारा कोरा करावा,तसेच शेतीला मोफत २४ तास वीज व पाणी मिळावे आदि मागण्यांबाबत परिषदेत शेतकरी संघटनेचे मार्गदर्शक रघुनाथ दादा पाटील व कायदेशीर मार्गदर्शक अडवोकेट अजित काळे मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील भारत राष्ट्र समिती, शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने सर्वांनी परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अनिल औताडे , यु्वराज जगताप, शिवाजी जवरे, रूपेद्र काळे, बच्चू मोढवे, नारायण टेकाळे, रणजित सूल डॉ. दादासाहेब आदिक, योगेश मोरे, बाळासाहेब मोरे, नानासाहेब गाढवे आदी जिल्हा व ता. पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात येत आहे. सदर परिषदेसाठी हरिभाऊ तुवर जिल्हा उपाध्यक्ष, बाबासाहेब खराडे ज्येष्ठ मार्गदर्शक,त्रिंबक भदगले तालुकाध्यक्ष नेवासा, बाबासाहेब नागोडे उपाध्यक्ष, नरेंद्र पाटील काळे संपर्कप्रमुख, रोहित कुलकर्णी युवा आघाडीप्रमुख,विजय पाटील मते खजिनदार,एडवोकेट विजय कावळे कायदेशीर सल्लागार, सागर लांडे प्रसिद्धी प्रमुख, किरण लंगे, कैलास पवार, भास्कर तुवर आधी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेऊन आयोजन केले आहे.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment