राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 3, 2023

*एक सामाजिक दायित्व म्हणून श्रीरामपूरातील सामाजिक कार्यकर्ते आणी पत्रकारांची बिंगो सर्कस व्यवस्थापनास सदिच्छा भेट*🌹🥀🌺🌷🌸 ❤️ ✅ 🇮🇳...

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्त -
श्रीरामपूर शहरांमध्ये संगमनेर रोड याठिकाणी सध्या सुरू असलेल्या बिंगो सर्कसच्या व्यवस्थापनास एक सामाजिक दायित्व म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व आभार मानण्याकरिता सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार शुभम अनंत पटेकर, सिद्धांत छल्लारे, दीपक कदम, प्रकाश निकाळे, सुनील उबाळे,प्रताप देवरे, अविनाश काळे,दिलीप मोरगे प्रमोद वाघमारे, प्रमोद गायकवाड यांनी भेट घेतली. याप्रसंगी सर्कस मालक सुनील चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
या बिंगो सर्कस मध्ये एकूण १२० कलाकार असून ते सर्व एकत्र कुटुंब प्रमाणे राहतात.त्यांचा हा एक चार पिढ्यांपासून व्यवसाय आहे.सध्याच्या काळामध्ये सर्कस कला लोप पावत चाललेली आहे. वाघ, सिंह,हत्ती, गेंडा इत्यादी जंगलातील प्राण्यांच्या सर्कशीमध्ये सहभागावर बंदी असल्यामुळे तसेच इंटरनेट वापरामुळे लोकांचा सर्कस पाहण्याकडील कल दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे, तरी देखील श्रीरामपूरकरांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे सर्कसचे मालक व मॅनेजर यांनी सांगितले. याप्रसंगी त्यांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.सुनिल उबाळे,सिद्धांत छल्लारे प्रताप देवरे, अविनाश काळे यांनी मनोगत व्यक्त केले. सर्कसचे आता शेवटचे तीन दिवस शिल्लक असून श्रीरामपूरकरांनी त्याचा लाभ घ्यावा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.
 या कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार दीपक कदम यांनी केले,तर शेवटी सर्कस मालक सुनील चव्हाण यांनी आभार मानले.

===================================
---------------------------------------------------
*पत्रकार दिपक कदम - श्रीरामपूर*
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क - श्रीरामपूर *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment