राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, November 3, 2023

*मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून श्रीरामपूरात उपोषण*

*उपोषणास सर्व पक्ष/संघटनांचा पाठिंबा*

श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून श्रीरामपूरात मराठा बांधवांनी उपोषण सुरू केले आहे.
या उपोषणास सर्व पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याने मराठा आरक्षणाबाबत शासनास योग्य निर्णय घेणे भाग पडणार आहे,
मराठा समाजाच्या या रास्त मागणीसाठी समस्त श्रीरामपूरकर, ज्येष्ठ नागरिक, सर्व समाजघटक सोबत असून झुरंगे यांच्या उपोषणास राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे‌.
शासनाच्या विनंतीला मान देऊन मनोज जरांगे यांचे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात दिनांक २ जानेवारी पर्यंत स्थगित जरी करण्यात आले असले तरी राज्यभर विविध प्रकारचे आंदोलन हे सुरुच राहणार आहे असे यावेळी सांगण्यात आले.

===================================
--------------------------------------------------
: - शौकत भाई शेख - शब्द... ✍️✅🇮🇳...रचना संकलन- वार्ता...संपादक,समता न्युज नेटवर्क श्रीरामपूर-+919561174111
---------------------------------------------------
===================================


No comments:

Post a Comment