💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
संत साहित्य ही भारतीय समाजाची सांस्कृतिक श्रीमंती आहे.संतांनी उच्च मानवतेची मूल्ये दिली.पुणे येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेचा'संत साहित्य पुरस्कार' डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या 'भारतीय कुंभार समाजातील संत 'या संशोधन ग्रन्थास घोषित झाला, हॆ भूषणावह असल्याचे मत श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोशिएशनचे उपाध्यक्ष दिनकरराव पोखरकर यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर येथील जिजामाता चौकातील जेष्ठ आनंद मेळावा आणि श्रीरामपूर तालुका पेन्शनर्स असोसिएशनच्या 'विरंगुळा 'केंद्रात डॉ. बाबुराव उपाध्ये यांना त्यांनी लिहिलेल्या 'भारतीय कुंभार समाजातील संत 'या प्रकल्प संशोधन ग्रन्थास पुणे येथील मातृमंदिर संस्थेचा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी अध्यक्षीय भाषणात दिनकरराव पोखरकर बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य टी. ई. शेळके, माजी प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे, जेष्ठ नागरिक मेळाव्याचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम, सचिव कचरू बोरुडे, खजिनदार दामोदर जानराव यांच्या हस्ते दोन्ही संघटनेतर्फे तसेच प्रा. शिवाजीराव बारगळ यांनीही डॉ.उपाध्ये यांचा सत्कार केला.प्रारंभी सौ. पुष्पाताई पोखरकर यांनी देशभूमीची प्रार्थना म्हटली. श्री.सी. के. भोसले यांनी श्रद्धांजली ठराव मांडला. दामोदर जानराव यांनी जमाखर्च सादर केला.डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी 'भारतीय कुंभार समाजातील संत 'पुस्तकाची माहिती दिली.विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी अनुदान दिलेला हा संशोधन प्रकल्प पुस्तकरूपाने प्रकाशित करावा असे पत्र दिले. पुणे येथील डॉ. स्नेहल तावरे यांनी स्नेहवर्धन प्रकाशनतर्फे हा ग्रन्थ प्रकाशित केला.महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार, कर्नाटकातील संत सर्वज्ञ, गुजरातमधील संत राका कुंभार, राजस्थानातील संत कुबा कुंभार,संत कुमावत साधू, पंजाबमधील कुंभार महात्मा संतराम बी. ए.,उत्तर भारतातील दक्ष प्रजापती,संतकवी डाका, आंध्रप्रदेशातील संत कवयित्री मोल्लाम्बा, मध्यप्रदेशमधील श्री श्री यादेमाता तसेच अमरावती, जळगाव, नागपूर इत्यादी भागातील कुंभार समाजातील विविध साधू, संत, ह.भ. प., महानुभाव साधू केशवमूर्ती दर्यापूरकर (कारभारी दत्तात्रय उपाध्ये ), कोतुळचे संत कोंडाजीबाबा, शिवराय भक्त सजन कुंभार, साईबाबा भक्त भाऊ महाराज कुंभार, पुणे येथील महात्मा धोंडीराम नामदेव कुंभार,अकोले येथील तुकाराम महाराज जाधव,श्रीरामपूर येथील संत कडूबा उफाड, ह. भ. प. तुळशीराम महाराज रसाळ असे अनेक संत, साधू यांचा अभ्यास या पुस्तकात आहे, डॉ. उपाध्ये यांनी सांगितले की २८ पुस्तकाचे परीक्षण डॉ. सुनीताताई जोशी, माधवीताई देसाई यांनी केले. प्रमुख अभ्यागत म्हणून माजी रजिस्ट्रार बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे डॉ.अजित महादेव कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.बुधवार दि.२२ नोव्हेंबर २०२३ रोजी १०.३० वा.नवनगर विद्यालय मनोहर सभागृह ज्ञानप्रबोधिनी निगडी पुणे - ४४ येथे पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती कार्यवाह म. व. देवळालकर यांनी दिली. डॉ. उपाध्ये यांनी संयोजकांचे धन्यवाद व्यक्त केले. यावेळी माजी प्राचार्य शेळके, लक्ष्मणराव निकम, प्रा. बारगळ, लेविन भोसले यांनी मनोगत व्यक्त केले.आनंदराव भोसले, आर. पी. ढोकचौळे, लता चिलवर, ए. ए. पठाण, दत्तात्रय रायपल्ली, व्ही. बी. भांबारे, विजयराव थोरात, प्रभा विधाते, प्रभा नाईक आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी गटशिक्षणाधिकारी के. पी. बोरुडे यांनी केले तर सी. के. भोसले यांनी आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार बी.आ.चेडे - शिरसगांव*
*सहयोगी:*
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment