💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*बी.आर.चेडे - शिरसगांव*
भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य ही सामाजिक संस्था संस्थापक/अध्यक्ष कैलास पवार यांच्या संकल्पनेतून व सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री अलकाताई कुबल यांच्या शुभहस्ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती दिनी लोकसहभागातून जन सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन असंख्य सेवाभावी लोकांना सोबत घेऊन राज्यभर राबवित असलेले सामाजिक उपक्रम कौतुकास्पद आणि गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन नामांकित सिल्वर गार्डीन्या ग्रुपचे संचालक संतोष भाऊ बारणे यांनी सांगितले.
सिल्वर गार्डीन्या ग्रुपच्या माध्यमातून उद्योजक संतोष बारणे यांचे नाव मोठ्या विश्वासाने स्वतःच्या हिमतीवर अग्रगण्य स्थानी आहेत.उद्योग क्षेत्राबरोबर संतोष बारणे हे समाजाची दातृत्वाची जबाबदारी देखील सातत्याने पार पाडत आहेत.असे प्रतिपादन माध्यमांशी बोलताना भूमी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कैलास पवार यांनी केले आहे. यावेळी संतोष बारणे यांनी भूमी फाउंडेशन च्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत संस्थापक अध्यक्ष कैलास पवार आणि संपूर्ण पदाधिकारी यांच्या कार्याला शुभेच्छा देत भूमी फाउंडेशनच्या सामाजिक कार्यात पुढे सहभागी होण्यास आनंद वाटेल त्याचबरोबर भूमी फाउंडेशनचे सर्वच उपक्रम कौतुकास्पद असतात आपण आपला विकास करत असताना गरिबांच्या भावनांचा नेहमीच विचार करायला हवा असे उद्योजक संतोष बारणे यांनी सांगितले.यावेळी संतोष बारणे यांनी दिवाळीनिमित्त कैलास पवार यांना फराळ भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी सिल्वर गार्डीन्या ग्रुपच्या उपस्थित सर्व कर्मचारी वर्गाचे कैलास पवार यांनी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या भीमराज बागुल, प्राचार्य टी ई शेळके,डॉ शंकरराव गागरे डॉ बाबुराव उपाध्ये, शिवाजीराव बारगळ, सुकदेव सुकळे, पत्रकार बी आर चेडे आदी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने आभार मानले.
===================================
---------------------------------------------------
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment