राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 14, 2023

*डी.डी.काचोळे विद्यालयात**शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा*

*देश-विदेशातील माजी विध्यार्थी
*मेळाव्यास उपस्थित राहणार*
श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
श्रीरामपूर शहरातील रयत शिक्षण संस्थेचे सर्वात जुने विद्यालय जनता विद्यामंदिर उर्फ डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी मेळावा शनिवार दिनांक १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत विद्यालय प्रांगणात आयोजित केलेला आहे या मेळाव्यासाठी स्थानिक तसेच देश - देशातील उच्चपदस्थ माजी विद्यार्थी उपस्थित राहणार आहे. तरी माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन माजी विद्यार्थी संघ व संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया यांनी केले आहे.
          विद्यालय स्थापनेपासून ते २०१५ या कालखंडात शिक्षण घेतलेले सर्व विद्यार्थी व माजी शिक्षक यावेळी उपस्थित राहणार आहेत.महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थी पुन्हा एकदा आपल्या शाळेमध्ये दाखल होणार असून अनेक वर्षानंतर शालेय जीवनाचा आनंद घेणार आहेत.स्थापनेपासून प्रथमच मेळावा होत असल्याने विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात उत्साह व प्रतिसाद आहे.
             मेळाव्याचे उद्घाटन मीनाताई जगधने मॅनेजिंग कौन्सिल सदस्या रयत शिक्षण संस्था सातारा, यांच्या शुभहस्ते तर जनरल बॉडी सदस्य प्रकाश निकम यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.
          मेळावा हा पूर्ण एकदिवसीय शाळा नियोजनावर आधारलेला आहे.११ ते ५ शालेय वेळेनुसार कार्यवाही होणार आहे. प्रार्थना, स्वागत,वर्ग अध्ययन, वर्गवार सालानुसार अध्ययन, गटचर्चा,विद्यार्थी परिचय,खेळ, विद्यार्थी मनोगत व अनुभव आदींचा समावेश आहे. मेळाव्याची संपूर्ण तयारी करण्यासाठी विविध समिती काम पाहत आहेत.नियोजनात बाहेरील विद्यार्थीही मदत करत आहेत. ऐतिहासिक मेळाव्याचे साक्षीदार होण्यासाठी सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे यासाठी मोठी संपर्क यंत्रणा उभी केली आहे. ज्या शिक्षकांनी या कालखंडात ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत त्यांनाही बोलवण्यात आले आहे.
           मेळावा यशस्वी पार पाडण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष किशोर गदिया,कार्याध्यक्ष समिन बागवान,सचिव पोपटराव शेळके,उपाध्यक्ष योगेश वाकचौरे, संजय छल्लारे,प्रकाश कुलथे, सल्लागार गणेश थोरात, मार्गदर्शक सुनील बोलके,मेजर कृष्णा सरदार,भाऊसाहेब मुळे,सदस्य निलेश भालेराव, राजेंद्र करांकाय,बाबासाहेब खोसरे,योगेश जाधव,सतीश सौदागर, कासिम सय्यद, अजय घोगरे आदीसह डी.डी.काचोळे विद्यालय सर्व स्टाफ,आदी परिश्रम घेत आहेत.
===================================
---------------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
*संकलन:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================

No comments:

Post a Comment