राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, November 14, 2023

*शहीद जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बेलापुरात एक पणती जवानासाठी उपक्रम संपन्न..!*


बेलापुर - प्रतिनिधि - / वार्ता -
आपले कर्तव्य बजावताना शहीद झालेले जवान व पोलीस बांधवांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त बेलापुर-ऐनतपूर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील विजय स्तंभ चौक येथे एक पणती जवानांसाठी- दीपोत्सव २०२३ हा उपक्रम राबविण्यात आला.
 फ्रेंडस् फाँर ऐव्हर गृप व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने सन २०१४ पासून दिपावली पाडव्याच्या दिवशी हा उपक्रम राबविण्यात येतो. हे या उपक्रमाचे १० वे वर्ष होते.सैन्य दलात कार्यरत असलेले मेजर दिनेश वाघ, मेजर निलेश अमोलिक, मेजर मुकुंद कुटे, माजी सैनिक देविदास देसाई, शरद देशपांडे,सुजित शेलार तसेच बेलापूर पोलीस औट पोस्ट चे रामेश्वर ढोकणे, बडे,हरीश पानसंबळ आदीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उपक्रमासास सुरुवात करण्यात आली. या नंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांच्या हस्ते पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.भारत भारत माता की जय,वंदे मातरम, शहीद जवान अमर रहे या घोषणानी परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी शहीद जवान व पोलीस बांधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदरचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी फ्रेंड्स फॉर एव्हर ग्रुप चे अभिषेक खंडागळे,अँड. मयुर साळुंके, विष्णुकांत लखोटीया, जयेंद्र खटोड, राजेश सूर्यवंशी,सुभाष शेलार,ऋतुराज नाईक,विजय कोठारी,वेणूगोपाल सोमाणी, निशिकांत लखोटिया,प्रभात कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ,सुमित सोमाणी,राम कुऱ्हे,सुभाष शेलार,महंत काळे,महेश कुऱ्हे, विशाल आंबेकर, सोमनाथ साळुंके, राहुल माळवदे आदींनी परिश्रम घेतले.

===================================
---------------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर*
====================
*सहयोगी:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================



No comments:

Post a Comment