मुंबई -प्रतिनिधि - / वार्ता -
राज्य सरकारने पाच सनदी अधिकाऱ्यांच्या ऐन दिवाळीत राज्यत बदल्या केल्या आहेत. त्यानुसार उपमुख्यमंत्री कार्यालयाचे (प्रधान सचिव आशिष शर्मा यांच्यावर राज्याच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) विभागाचे आयुक्त म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर जीएसटी विभागाचे आयुक्त राजीव मित्तल यांची केंद्रीय प्रतिनियुक्ती जाहीर करण्यात आली आहे...
मंत्रालयातील पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे सहसचिव प्रवीण पुरी यांची पुणे येथे दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांची बदली कर्मचारी राज्य विमा योजनेच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे.
अहमदनगर (येथील जिल्हा जात पडताळणी समितीचे अध्यक्ष विकास पानसरे यांची कोकण विभागात अतिरिक्त विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अमन मित्तल यांची मंत्रालयात पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
===================================
---------------------------------------------------
: - आशिष रत्नानाकर, संकलन वार्ता...✍️✅🇮🇳
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment