-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^-^
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
*वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन*
{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{÷}{
मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर अशा मोठया शहरातही दर्जेदार दिवाळी अंक दिसत नाहीत. मात्र श्रीरामपूर येथील सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे संपादित वर्ल्ड सामना दिवाळी विनोदी विशेषांकामुळे दिवाळीची मेजवाणी अधिक लज्जतदार झाली असून आजच्या मोबाईलमय झालेल्या पिढीने असे दिवाळी अंक जरूर वाचले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
नागपूर येथे मंत्री गडकरी यांच्या शुभहस्ते त्यांच्या निवासस्थानी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात वर्ल्ड सामना दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. त्याप्रसंगी ना.गडकरी बोलत होते.
यावेळी राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, मुख्य संपादक प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मंत्री गडकरी यांचा कुलथे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे यांनी प्रास्ताविकात वर्ल्ड सामना दिवाळी अंकाची वाटचाल आणि गुणवत्ता यांची माहिती दिली.
यावेळी मंत्री ना. गडकरी यांनी 'वर्ल्ड सामना 'दिवाळी अंक मनापासून चाळत प्रत्येक विनोदी कथा, संशोधन लेख, कविता, चारोळ्या, व्यंगचित्रे पाहून आनंद व्यक्त केला. ते म्हणाले वंचित उपेक्षित कष्टकरी यांच्याविषयी साहित्यिकांनी प्रखर लिखाण केले पाहिजे. साहित्य, संस्कृती व समाज घडवण्याची व जिवंत ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर आहे. अश्या अंकामुळे साहित्याची उंची नक्कीच वाढते, या दिवाळी अंकाची मांडणी आणि जाहिरातीची आकर्षकता फारच मनमोहक आहे. त्याबद्दल परिवाराचे तसेच इतर सर्व सहकारी यांचे मी मनापासून अभिनंदन करतो, असे सांगून ना. गडकरी यांनी वर्ल्ड सामना सारखे दिवाळी अंक फराळाबरोबर घरोघरी दिसलें पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्याबरोबर ज्या शहराची नगरपालिका सुरु झाली, ग्रामीण जनजीवनाशी जे शहर एकरूप आहे, अशा शहरात साहित्य आणि मनोरंजन गुणवत्तेने दर्जेदार असलेला दिवाळी अंक गेल्या ३२ वर्षांपासून प्रकाशित होतो, हॆ विशेष कौतुकास्पद असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभार प्रकाश कुलथे यांनी मानले.
===================================
---------------------------------------------------
*फोटो ओळी*-
सौ.स्नेहलता प्रकाश कुलथे संपादित वर्ल्ड सामना दिवाळी विनोदी विशेषांक २०२३ चे प्रकाशन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, राज्याचे माहिती आयुक्त राहुल पांडे, नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, संपादक प्रकाश कुलथे, कार्यकारी संपादक स्वामीराज कुलथे.
======
*संकलन:*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
---------------------------------------------------
===================================
No comments:
Post a Comment