श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
आज मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी श्रीरामपूर तहसिल कार्यालय येथे ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी केले आहे.
श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारत येथे आज मंगळवार दि.२६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. तहसिल कार्यालय, प्रशासकीय इमारत येथे ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्राहक दिनात ग्राहकांच्या अडीअडचणी व सुचना यावर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच ग्राहकांमध्ये ग्राहक चळवळीचा जनतेला परीचय व्हावा, ग्राहकांचे प्रबोधन व्हावे म्हणून हा ग्राहक दिन साजरा करण्याचे बाबत शासनाने सुचीत केलेले आहे. त्यानुसार सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आलेले आहे.
या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थीत रहावे असे आवाहन श्रीरामपूरचे तहसिलदार मिलींदकुमार वाघ यांनी केले आहे.
=================================-----------------------------------------------
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
===============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment