राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, December 25, 2023

मोखाडा तालुक्यातील तिन शाळेंना माऊली ग्रुप व टाटा समूह यांच्या कडून टीव्ही भेट


सौरभ - कामडी - / पालघर -
मोखाडा : पालघर जिल्ह्यातील अतिशय दुर्गम तालुका असून येथे आदिवासी समाजाचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात बऱ्याच घरांमध्ये व शाळेत स्मार्ट टीव्ही नसल्याने विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण मिळावे व शाळेत उपस्थिती वाढावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून माऊली ग्रुप डोंबिवली यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला असून प्रत्येक शाळेत स्मार्ट टीव्ही भेट देऊन विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट बनवता यावेत सांस्कृतिक कार्यक्रमासाठी व शैक्षणिक अभ्यासक्रम दाखवण्यासाठी महापुरुषांची इतिहास बघता यावा तसेच एका शिक्षकाची उणीव स्मार्ट टीव्ही भरून काढत असल्याने उपक्रम शहापूर व मोखाडा तालुक्यात सुरू केला असून तिथे चांगल्या प्रकारे विद्यार्थी व शिक्षकांत प्रतिसाद मिळत आहे.विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेत असल्याचे शाळेतील व्हिडिओ मधून समजले आहेत, गावातील पालकांमध्ये सुद्धा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत मोखाडा व शहापूर तालुक्यात ८० स्मार्ट टीव्ही वितरण करण्यात आले असून स्मार्ट टीव्ही काही लोक आपल्या मुलांचा वाढदिवस, विवाह, साध्या पद्धतीत साजरा करत शाळेला स्मार्ट भेट देत असतात. मुकुंद टिलक सरांनी धोंड मारायची मेट व टाटा समूह यांकडून शिरसोनपाडा व काकडोशी येथे स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आली. यावेळी संतोष बोंद्रे सर चारुदत्त कोळकर ,मुकुंद टिलक व टाटा समूहाचे टीम उपस्थित होती. तिनही गावातील ग्रामस्थांनी, शाळा व्यवस्थापन समिती यांनी माऊली ग्रुप वर टाटा समूह यांचे आभार मानले.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार सौरभ कामडी - पालघर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment