राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, December 26, 2023

कला, साहित्य, संस्कृती साठी "स्नेह संयोग" दिनदर्शिका २०२४ उपयुक्त - खंडू माळवे


मुंबई विशेष प्रतिनिधी
"स्नेह संयोग" दिनदर्शिका 2024 चे प्रकाशन साहित्यिक राष्ट्रीय कवी डॉ.खंडू रघुनाथ माळवे यांच्या हस्ते डोंबिवली येथे प्रकाशन झाले. यावेळी सिनेअभिनेत्री जयश्री काळे व समाजसेवक कवी,पत्रकार शशिकांत सावंत उपस्थित होते. 
भारत सरकारमान्य असलेले साप्ताहिक स्नेह संयोग गेली पंधरा वर्षापासून सातत्याने चालू आहे. समाजसवेचा ध्यास असलेले कला,साहित्य, संस्कृती, अध्यात्म यांचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने सातत्याने प्रकाशित होत असते. त्याच प्रमाणे स्नेह संयोग वार्षिक दिनदर्शिका ही गेली सात आठ वर्षे प्रकाशित होत आहे.. यामध्ये विविध माहिती सहित आकर्षक आणि कलर फुल ग्लॉसी पेपर वर ची सुबक छपाई व आकर्षक मांडणी आहे. असे राष्ट्रीय कवी खंडू माळवे यांनी आपल्या भाषणात गौरवोद्गार काढले. तसेच सौ.जयश्री काळे व पत्रकार शशिकांत सावंत यांनीही या संपादक संतोष सावंत यांचे व दिनदर्शिकाच्या सुंदर व आकर्षक मांडणी बद्दल तोंड भरून कौतुक केले. 
यावेळी संपादक प्रकाशक संतोष सावंत यांनी सर्व जाहिरातदारांचे व सहकारी वर्ग कवी विलास देवळेकर, कवी साहित्यिक विलास खानोलकर,रेवती आळवे मॅडम, यांचेही खास आभार मानले. आणि उपस्थित राहिलेल्या पाहुण्याचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
==================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment