राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Friday, January 5, 2024

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरासंदर्भात जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहिम राबविण्यात येणार

दुचाकी चालवताना हेल्मेट वापरासंदर्भात जिल्ह्यात प्रबोधनात्मक मोहिम राबविण्यात येणार

जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध

अहमदनगर जिमाका वृतसेवा
दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचे आहे. बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात असे दिसून
 आले आहे.
हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधनात्मक व अंमलबजावणीविषयक व्यापक मोहीम अहमदनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला असल्याचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
  जिल्ह्यात सन २०२२-२०२३ मध्ये घडलेल्या अपघाताचे तुलनात्मक विश्लेषण केले असता या वर्षामध्ये घडलेल्या एकूण रस्ते अपघातांमध्ये दुचाकी व पादचा-यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे. या अपघातांपैकी ७० ते ८० % अपघात हे फक्त दुचाकी व पादचा-यांचे आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ मधील कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार हेल्मेटट वापरासंबंधी तरतुदीचा भंग करणाऱ्या अथवा त्यास संमती देणाऱ्या व्यक्तीस दंडाची तरतूद आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणे किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे कलम १९४ ड मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करणा-यांस प्रतिबंध करण्यात आला आहे.
कलम १९४ ड अन्वये विनाहेल्मेट दुचाकी चालविणे
 किंवा चालविण्यात संमती देणे अशा दोघांवरही जबाबदारी निश्चित करण्यात आलेली असून त्यांना दडात्मक कारवाईची तरतूद आहे. एखादी व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयात विनाहेल्मेट दुचाकीवर प्रवेश करतांना आढळून आल्यास १९४ ड च्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीकोनातून
 कार्यालयातील अशा विनाहेल्मेट दुचाकीवर येणा-यांची यादी परिवहन कार्यालयास कळविण्यात येऊन संबंधित व्यक्तींवर मोटार वाहन काय‌द्यातील विहीत तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार रमेश जेठे (सर) अहमदनगर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment