💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
शहरातून बाळ येशुचा जन्म देखावा साकारत भव्य कॅन्डल मिरवणुक, कॅरल सिंगीग, भाविकांसाठी प्रायश्चित्त संस्कार, पवित्र मिसा बलिदान विधी, शहरी व ग्रामीण भागासाठी गव्हाण स्पर्धा, बायबल क्विज (प्रश्नमंजुषा) असे विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन नाताळ सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला.
या नाताळ सप्ताहाची सांगता नुकतीच लोयोला सदन येथे स्नेह मेळाव्याने करण्यात आली. दरवर्षी प्रमाणे याही वेळी धर्मग्राम स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अबाल वृद्धांपासून सर्वांनीच आपला कलाविष्कार दाखवत सहभाग नोंदवला. कलाकारांच्या अप्रतिम सादरीकरणाने त्या गुलाबी थंडीत ही कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढत गेली. दरम्यान भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी रेव्ह.फा.ज्यो गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उत्कृष्ट निवेदन सेंट झेवियर्स हायस्कूलचे शिक्षक श्री. रविंद्र त्रिभुवन यांनी आपल्या ओघवत्या व बहारदार शैलीत केले.
हा संपुर्ण सप्ताह लोयोला धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु रेव्ह.फा.ज्यो गायकवाड, सेंट झेवियर्स हायस्कूलचे प्राचार्य रेव्ह. फा.टायटस थंगराज, दिव्यवाणीचे डायरेक्टर रेव्ह.फा.अनिल चक्रनारायण, सेंट झेवियर्स टेक्निकलचे डायरेक्टर रेव्ह. फा.संपत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
वरील सर्व कार्यक्रम यस्वीतेसाठी सेवक प्रतिनिधी कमलाकर पंडित, रविंद्र त्रिभुवन, विजय त्रिभुवन, उत्तम गायकवाड, जाॅन धिवर, लाजरस गायकवाड, ललित गायकवाड, राकेश दुशिंग, प्रवीण सात्राळकर, संदिप साळवे , शोभा त्रिभुवन, लत्ता बनसोडे , बेनिग्ना पवार, सौ.निर्मला अमोलिक, पुष्पा साठे, विजया दळवी, सविता वाघमारे, सुवर्णा बोधक, संगीता पंडित, कनोसाच्या सिस्टर लुईजा गोन्सालवीस, सेंट लुकच्या सिस्टर रिटा व सिस्टर फातिमा ,सि जॅकलिन व युथ ग्रुप तसेच महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* - स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment