राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 3, 2024

भोकरला क्रांतीज्योती सावित्रीमाई.उत्साहात फुले जयंती साजरी................💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- भोकर  - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर ग्रामपंचायत कार्यालय व सोसायटी कार्यालय येथे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 192 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लोकनियुक्त सरपंच सौ. शितलताई पटारे व उपसरपंच सागर आहेर यांचे हस्ते तर विविध कार्यकारी सोसायटी कार्यालय येथे सोसायटीचे नवनिर्वाचीत चेअरमन आण्णासाहेब काळे व नानासाहेब जगदाळे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून स्त्री शिक्षणाची ज्योती क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांना विनम्र अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात प्रताप पटारे, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदिंसह मान्यवर उपस्थीत होते तर सोसायटी कार्यालय येथे गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदिंसह मान्यवर उपस्थीत होते.

*बॉक्स - १*
भोकर ग्रामपंचायत कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना सरपंच सौ.शितलताई पटारे, उपसरपंच सागर आहेर, सागर शिंदे, सम्राट माळवदे, पत्रकार चंद्रकांत झुरंगे, सुरेश अमोलीक, राहुल अभंग, मयूर काळे, गीरीष मते, संदिप गांधले, काळू गायकवाड, रावसाहेब लोखंडे, रमेश भालके, शंकर बेरड, पप्पू थोरात, सुनिल साळवे, सोमनाथ पंडीत आदि दिसत आहेत.(छाया-पप्पू थोरात)

*बॉक्स - २*
भोकर सोसायटी कार्यालय येथे क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना पुष्पहार अर्पण करताना चेअरमन आण्णासाहेब काळे समवेत नानासाहेब जगदाळे, गणेश छल्लारे, महेश पटारे, कारभारी तागड, बाळासाहेब विधाटे, भाऊराव सुडके, पप्पू थोरात, नारायण पटारे, बाबुराव तागड, नवनाथ मते, गोरक्षनाथ आबुज आदि दिसत आहेत.(छाया- चंद्रकांत झुरंगे,भोकर)

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर*
============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन* ✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment