💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
- शौकतभाई - शेख -/श्रीरामपूर -
चर्मकार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी संत शिरोमणी गुरु रविदास महाराज प्रेरणा यात्रेचे आयोजन करण्यात आले
असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या यात्रेचे प्रस्थान श्रीरामपूर येथून होणार असून ती अहमदनगर मार्गे कात्रज, पुणे येथील संत रविदास महाराज तिसरे धाम या ठिकाणी संपन्न होणार आहे.
या यात्रेचे स्वरूप सामाजिक एकात्मता, सलोखा, प्रबोधन, समाजसेवा व समाजोन्नती व्हावी या हेतूने तसेच गुरु रविदास महाराजांचे समतावादी विचार समाजातील व तळागाळातील लोकांपर्यंत रुजले जावेत म्हणून समाजातील लोकांनी एकत्रितपणे प्रवास, सामाजिक स्थळ दर्शन व समूह भोजन करून
सत्कार्याच्या प्रेरणेची लेन देन करावी अशी आहे. त्यामुळे या यात्रेबद्दल समाजातील लहान - थोरांच्या मनात आनंद व उत्साह असल्याचे दिसून येत आहे.
त्या उत्साहापोटीच या यात्रेतील यात्रेकरूंची श्रीरामपूर ते
पुणे या मार्गामध्ये सावेडी, अहमदनगर, दिल्ली
गेट,केडगांव, चास, शिरूर,रांजणगांव व भीमा कोरेगांव
तसेच पुण्यातील अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात
येणार आहे.
चर्मकार समाजातील ही प्रथम यात्रा असून या यात्रेची
सर्वत्र चर्चा तर होत आहेच शिवाय चर्मकार संघर्ष
समितीचे कौतुक देखील होत आहे. आज समाजाला
संतांच्या सदविचार व आचरणाची गरज असून ती
जोपासली जावी तसेच संत रविदासांनी अंधश्रद्धा व
रूढीगत अनिष्ट विचारांना थारा न देता समाजाची
पिळवणूक करणाऱ्या व समाजाला अज्ञानाच्या खाईत लोटणाऱ्या समाजकंटकांचा तीव्र निषेध व विरोध केला व समाज जागृत करण्याचे महत्कार्य केले. हे अविरत समाज मनावर कोरले जावे हाच या यात्रेमागील मुख्य उद्देश असल्याचे चर्मकार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. शिवाजीराव साळवे यांनी सांगितले आहे.
कात्रज येथील गुरु रविदास यांचे भव्य मंदिर हे भारतातील तिसरे धाम असून चर्मकार समाजातीलच नव्हे तर प्रत्येक समाजातील व्यक्तीसाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच हे तिसरे धाम समाजातील अतिशय कमी लोकांना ज्ञात असल्यामुळे तिथे जाणाऱ्या समाज बांधवांची संख्या कमी आहे. या यात्रेमुळे समाजातील लोकांना प्रेरणा मिळून ते चर्मकार संघर्ष समितीचे
अनुकरण करतील अशी आशा आहे. तसेच भावी काळातील गुरु रविदास महाराजांची जयंती सर्व समाज एकत्रितपणे याच ठिकाणी साजरी करेल तो दिवस एक स्वर्गीय सोहळा असेल यात शंकाच नाही. त्यामुळे मा. शिवाजीराव साळवे यांनी समाजातील सर्वच लोकांनी अशा एकापेक्षा एक यात्रेचे आयोजन करून आपली सामाजिक एकात्मता दर्शवावी असे आव्हान केले आहे. हे तिसरे धाम चर्मकार समाजाचे शक्ती पीठ म्हणून ओळखले जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
हे भव्य दिव्य तिसरे धाम निर्माण करण्याकरिता मा. सुखदेवजी वाघमारे महाराज व त्यांच्या सहकाऱ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली असून समाजातील प्रत्येक व्यक्ती त्यांचे आदराने अभिनंदन करून आभार मानत आहे.
तसेच ही यात्रा यशस्वी होण्यासाठी चर्मकार संघर्ष समितीतील सर्व महिला व पुरुष पदाधिकारी अतोनात कष्ट घेत आहेत हे सांगताना त्यांचा ऊर अभिमानाने भरून आले.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment