*अमन सय्यद - बेलापूर*
श्रीरामपूर - तालुक्यातील बेलापूर येथील जे.टी.एस. हायस्कूलमधील १९८२ बॅचच्या विद्यार्थ्यांची एकमेकांना भेटण्यास फार उत्सुक होते. त्या अनुसयाने दहावीच्या बॅचचे स्नेहसंमेनात जवळपास ६० ते ७० विद्यार्थ्यांनी ४१ वर्षानंतर आपल्या जुन्या मित्रांची भेट घेत पुन्हा शालेय जीवनाचा आनंद घेतला. येणार्या नवीन वर्षात एक नवा जोश सर्वांच्या मनामध्ये भरला व कार्यक्रमाचे जल्लोष हे नाव सार्थ झाले.
सध्या कुठे राहतात काय व्यवसाय कमरतात, असा संक्षिप्त परिचय करून देण्यात आला. सर्वांचे परिचय पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी मिळून ग्रुप फोटो काढण्यात आला. त्यानंतर पुन्हा सभेला सुरुवात होऊन उपस्थितांपैकी एकेकाने आपले मनोगत करून देण्यात आला. सर्वांनी आपल्या भाषणातून अशा पद्धतीने एकत्र येण्याची गरज व्यक्त केली व यापुढे
वेळोवेळी भेटण्याची इच्छा व्यक्त केली सर्वात अध्यक्षीय भाषण रोहिणी जोशी यांनी केले.नियमाप्रमाणे दुपारी दोन वाजता जेवणाची सुट्टी झाली. सर्वांनी यथेच्छ भोजन करून अतिशय रुचकर भोजन व्यवस्था
केल्याबद्दल संयोजकांना मनोमन धन्यवाद दिले.
थोडीशी विश्रांती घेऊन त्यानंतर पुन्हा दुपारचे सत्र चालू
झाले. या सत्रात गप्पा गोष्टी गाणी इत्यादी सादर
करण्यात आले संगीता लखोटिया यांनी सुंदर गझल म्हटली. आलम शेख यांनी कविता सांगितली तर संजय शिरसाठ यांनी गवळण व अभंग सादर केले. कमल किशोर मुंदडा यांनी मित्राची गरज विशद करणारी सुंदर कविता सादर केली. त्यानंतर अंताक्षरीचा खेळ घेण्यात आला व आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना गिफ्ट पॅकेट व सर्वांची जन्म तारीख व पत्ते असलेले कार्ड देण्यात आले. त्याचबरोबर संजय लढढा यांच्या राजस्थानी गृह उद्योगतर्फे चकलीपीठ, अनारसे पीठचे फ्टि हम्पर देण्यात आले. कार्यक्रमाच्या समारोपात सुनीता थोरात यांनी एखादी ट्रीप काढावी अशी सूचना केली तसेच कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल संयोजकांचे व सर्वांचे आभार प्रदर्शन व्यक्त करून सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेछा दिल्या. त्यानंतर सर्वांनी स्टेज जवळ जमा होऊन गाण्यांच्या तालावर नाचण्याचा आनंद घेतला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इस्माईल शेख यांनी उत्तमरीत्या केले. त्यानंतर बटाटेवडा, चहा असे हाई टी घेऊन सर्व मंडळी आपापल्या घरी रवाना झाली. एकंदरीत या कार्यक्रमामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या अंगात जोश निर्माण झाला व कार्यक्रमाचे जल्लोष ८२ नाव सार्थक झाले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास चायल, गजानन डावरे, अनिल शेजुळ, प्रदीप देशमुख, रवींद्र करपे सतीश चायल, रोहिणी जोशी आवटी, गुणवंत मुथा यांनी प्रयत्न केले. सदर कार्यक्रमास पूर्वाश्रमीच्या शारदा चायल, ज्योती मुंदडा, सुनंदा नाईक, माधुरी नारद, विद्या साळुंखे, विद्या वैद्य, माया मुंडलिक, राजेंद्र राठोड, विलास पुंड, गोरख बोल्हे, भगीरथ चिंतामणी,राजेंद्र लखोटिया, नंदलाल लड्डा, बद्रीनाथ शर्मा, शिवाजी माळवदे, संजय शिरसाठ, सतीश माने इत्यादी सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
४१ वर्षानंतर जे.टी.एस. हायस्कूलमधील १९८२ बॅचच्या विद्यार्थ्यांची एकमेकांना भेटण्यास फार उत्सुक होते. आपण शाळेत पाहिलेले मित्र-मैत्रीण आता कसे दिसतात याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. रविवारी सगळ्यांचे आगमन झाले. आल्याबरोबर सगळ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर सर्वजण गेटवर जमा झाले. सर्वांचे बँडच्या मधुर सुरात गुलाबपुष्प व गिफ्ट देऊन स्वागत गावातील विद्यार्थ्यांच्या पत्नीकडून करण्यात आले. सर्वजण आपापल्या जागी स्थानापन्न झाल्यानंतर शाळेची जुनी प्रार्थनाया कुंदेंदू तुषार हार धवला म्हणण्यात आली. त्यानंतर दिवंगत शिक्षक व विद्यार्थी मित्र यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी विद्यार्थ्यांपैकीच एक शिरूर येथील शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका रोहिणी जोशी-आवटी यांच्या नावाची सूचना कैलास चायल यांनी मांडली त्याला अॅड. वाय. के. शेख यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमिका, जल्लोषचे महत्व, व प्रस्तावना कमल किशोर मुंदडा यांनी मांडली. त्यानंतर उपस्थित असलेल्या त्या वेळेच्या शिक्षिका गोरे यांचे सर्व शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधीक स्वरूपात स्वागत व सन्मान करण्यात आला. त्याला गोरे यांनी मार्गदर्शनपर उत्तर दिले व सगळ्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. निरोप समारोपाच्या कार्यक्रमात वन डे ट्रीपचे छान नियोजन करा अशी आयोजकांवर जबाबदारी टाकण्यात आली. नवीन वर्षाच्या एकमेकांवर शुभेच्छा देऊन कार्यक्रम सोहळा उत्साहात पार पडला.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार गुलामरसुलभाई जहागीरदार अहमदनगर*
======
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment