- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर - हरेगाव दरम्यान हरेगाव फाट्यावर असलेले लोकसेवा प्रार्थना भवन "येशू का दरबार" या ठिकाणी सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०२४ रोजी मानवता आणि जगाच्या कल्याणासाठी प्रार्थना करुन सर्वांना नवीन वर्षाचा शुभसंदेश देण्यात आला.
संपूर्ण विश्वाला प्रेम,दया, क्षमा व शांतीचा संदेश देणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची जयंती व नवीन वर्षाचा संदेश देऊन आनंदी वातावरणात आणि मोठ्या उत्साहात तथा भक्तीभावाने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम लोकसेवा प्रार्थना भवनचे संस्थापक पास्टर प्रशांत चक्रनारायण व सिस्टर प्राजक्ता चक्रनारायण यांच्या उपस्थितीत पार पडला. प्रभू येशू ख्रिस्ताचे जीवनाचे महत्व आपल्या किती महान आहे.यांचे महत्त्व भाविकांना पटवून सांगितले. याप्रसंगी शामराव जाधव दादा, एलिया जाधव,पुष्पा पठारे, विलास पठारे,सविता पठारे, भाऊसाहेब तोरणे,कानिफनाथ खवले,सारिका खवले, राजू शिंदे ,पूजा शिंदे संगमनेर,दुशिंग परिवार,राज बनसोडे , सृजन कदम,विश्वास थोरात, अमन पठारे,अभय पठारे,साळवे ताई इत्यादी इत्यादी प्रार्थना कार्यक्रमास उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment