राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, January 3, 2024

*१ जानेवारी शौर्य दिनानिमित्त अस्तगांवमध्ये शूरवीरांना विनम्र अभिवादन कार्यक्रम संपन्न*


*अजीजभाई शेख / राहाता*
राहाता तालुक्यातील अस्तगांव याठिकाणी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान,एकता ग्रुप व समस्त अस्तगांवकर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने १ जानेवारी रोजी शौर्य दिन या सोहळ्याचे आयोजक एकता ग्रुप व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान अस्तगांव संस्थापक अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन व युवक कार्यकर्ते गौरव त्रिभुवन यांच्या विशेष पुढाकाराने या कार्यक्रमाचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अस्तगांव येथे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ या प्रमाणेच हुबेहूब आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करून सुंदर असा विजयस्तंभ साकारण्यात आला होता,यासाठी गौरव त्रिभुवन व ग्रुपमधील सर्व पदाधिकारी,सदस्य यांचे मोठ्या प्रमाणात अनमोल सहकार्य लाभले.
यावेळी आर.पी.आयचे युवक जिल्हाध्यक्ष अध्यक्ष पप्पूभाऊ बनसोडे यांच्या हस्ते बौद्धवंदना घेऊन,फुले अर्पण करत शौर्य लढ्यातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली व त्यानंतर अस्तगांव बाजारतळ येथे जंगी मिरवणूक काढण्यात आली, यावेळी युवकांनी व महिलांनी मोठ्या जल्लोषात संगीताच्या तालावर ताल धरून नृत्य सादर केले.
यावेळी आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान व एकता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन,आरपीआय शहराध्यक्ष महेश त्रिभुवन, गौरव त्रिभुवन,पप्पू खरात,भीमा त्रिभुवन, आर.पी.आय. युवक जिल्हा उपाध्यक्ष दीपक भाऊ शिंदे, सोहेल शेख,आकाश सोन्याबापु त्रिभुवन, प्रमोद त्रिभुवन,अविनाश त्रिभुवन, शमशुद्दीन शेख,जाकीर शेख,पप्पू शेख,समद शेख,अस्तगावचे पोलीस पाटील राजेश त्रिभुवन, माजी सभापती श्रीनिवास त्रिभुवन,आर.पी.आय. युवक तालुकाध्यक्ष जितू दिवे, चालक-मालक संघटना तालुका अध्यक्ष बाळासाहेब खाडे,ललित शेळके,अतुल बनसोडे,अश्फाक शेख, अजय सोनवणे,बापू बनसोडे,मयूर खडिझोड, ऋतिक त्रिभुवन,बबलू खरात,मुबीन शेख, श्रेयश त्रिभुवन,भिकाजी त्रिभुवन, ज्ञानेश्वर त्रिभुवन,सुमित त्रिभुवन, रवी सापते,ऋषिकेश त्रिभुवन,रुद्र त्रिभुवन,रवी त्रिभुवन,सुंदर त्रिभुवन, विजय त्रिभुवन, प्रकल्प त्रिभुवन, सौरभ त्रिभुवन, बाल्या त्रिभुवन,गौतम त्रिभुवन,भीम पारखे,राजू त्रिभुवन,नितीन त्रिभुवन,सागर त्रिभुवन,सागर पेटारे, आयान शेख,प्रशांत त्रिभुवन,सलीम शेख,हुजेफ शेख, विरेश त्रिभुवन,यश त्रिभुवन, सुनील सांगळे,रंजन त्रिभुवन,जितू त्रिभुवन, मिथुन संसारे, अण्णासाहेब त्रिभुवन, किरण त्रिभुवन, विशाल त्रिभुवन,पांडू त्रिभुवन,मोसिन शेख, विशाल शेख,आदिल शेख,प्रतीक खरात,तुषार सरोदे,सतीश मोरे,चाचा पडघलमल,आकाश गायकवाड,साहिल गायकवाड, सचिन खरात,यश गायकवाड, इरफान शेख,साहिल त्रिभुवन, सौरभ पवार, राहील शेख,अमन शेख, अतुल लोंढे, सिद्धांत कोळगे,गौतम खरात,आतिक शेख, शाहिद शहा,आफान शहा, शामवेल त्रिभुवन,अरबाज शेख, फरान खाटीक, मोबीन पठाण, शोएब शेख,उमर शेख,करण त्रिभुवन,संभाजी मेढे,जालिंदर गायकवाड, सत्यम जाधव,अजय सोनवणे,कृष्णा सोनवणे, सचिन सोनवणे,सुनील पवार,अमोल गायकवाड, संतोष गायकवाड, योगेश पारखे आदीसह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व अस्तगावकर ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे अध्यक्ष जॉन भाऊ त्रिभुवन यांनी आभार मानले व राहाता तालुका पंचक्रोशी मध्ये पहिल्यांदाच अशा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्याबद्दल अस्तगावकर ग्रामस्थांच्यावतीने संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्याचे कौतुक देखील करण्यात आले.
=================================
-----------------------------------------------
*शाह मुश्ताकअली (मामु) राहाता*
============
*मार्गदर्शक:* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================




No comments:

Post a Comment