- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने निराधार, अपंग किंवा एकलपालक मुलांच्या पुढील शिक्षणासाठी परदेशी दाम्पत्यांनी बाल संगोपन योजना प्रभावीपणे राबवून हजारो निराधार बालकांना मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले आहे. श्रीरामपूर शहर काँग्रेस, हेमंत ओगले मित्र मंडळ, साई सोशल फाउंडेशन व तुळजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या बालसंगोपन योजने अनंर्गत मागील ५३९ व नव्याने २८४ बालके व त्यांचे पालक असे ४०० जणांची अहमदनगर येथील बाल संगोपन कार्यालय येथे जाण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली त्याप्रसंगी ससाणे बोलत होते. अपंग, एकलपालक किंवा निराधार मुलांना महाराष्ट्र शासनाकडून बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा २२५० रु. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत मिळतात. अशा गरजू विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन आवश्यक ती कागदपत्रे परदेशी दाम्पत्याने घरोघर जाऊन जमा केली व प्रस्ताव पूर्ण करून पाठपुरावा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला. ससाणे पुढे म्हणाले निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत व कोणत्याही परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबता कामा नये. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले सर्वसामान्यांना मदत करून त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची स्व. ससाणे साहेबांची परंपरा ससाणे कुटुंबीयांनी जपली असून परदेशी दांपत्यांचं कार्य कौतुकास्पद असल्याचे म्हटले. या कार्यक्रम प्रसंगी जि प चे माजी सभापती बाबासाहेब दिघे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, बाजार समितीचे संचालक खंडेराव सदाफळ, विलास दाभाडे, राजू चक्रनारायण, मा. नगरसेवक रमेश कोठारी ,के. सी. शेळके,दिलीप नागरे, रितेश रोटे,आशिष धनवटे, प्रमोद भोसले, मुरली राऊत, मीनानाथ खडके, द्वारकानाथ बडधे, संतोष परदेशी, सौ आशाताई परदेशी,विलास लबडे, भगवान उपाध्ये, प्रविण नवले, सुरेश ठुबे, अमोल शेटे, रितेश एडके, सिद्धार्थ फंड, गोपाल लिंगायत, सनी मंडलिक, रियाजखान पठाण, अशोक जगधने, बाळासाहेब इंगळे, सुभाषराव गायकवाड, सुनील साबळे, बाबा वायदंडे, रणजीत जामकर, नवाज भाई शेख, भैय्याभाई अत्तार,अतिशभाई शेख, अमोल नाईक, ॲड.प्रशांत राऊत, जाफर शहा, अंबादास निकाळजे, संजय गोसावी, कसबे सर, कुणाल पाटील,शुभम पाटील, अजय धाकतोडे, राजेश जोंधळे, विशाल साळवे, सोनू जामकर, प्रशांत कांबळे, कैलास छल्लारे, सागर दुपाटी, श्रेयस रोटे, कल्पेश पाटणी, तीर्थराज नवले, सिद्धार्थ जगताप, प्रणव जाधव आदी मान्यवर, बालसंगोपणाचे शेकडो लाभार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
======
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment