श्रीरामपूर प्रतिनिधि वार्ता
संजय गांधी निराधार अर्थसहाय्य योजना व इतर सामाजिक अर्थसहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांसाठी सध्या असलेली २१ हजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अट अत्यंतु जटिल व अन्यायकारक आहे. त्यामुळे ही मर्यादा वाढवून १ लाख रूपये करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य व भाजपचे श्रीरामपूर शहर उपाध्यक्ष मिलिंदकुमार साळवे यांनी केले.
शिरसगाव (ता. श्रीरामपूर ) येथे आयोजित महिला मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्रीरामपूरच्या संजय गांधी निराधार योजनेचे नवनियुक्त अध्यक्ष गणेश मुदगुले होते. याप्रसंगी सरपंच राणी वाघमारे, उपसरपंच संजय यादव, सदस्य नितीन गवारे, सुरेश मुदगुले, अण्णासाहेब ताके, सोपान गवारे, जायदा पठाण, इंदूबाई बढे, प्रयागा जाधव व इतर सदस्यांसह मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य बाळासाहेब जपे, मुकुंद टंकसाळे आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल क्रांती महिला ग्रामसंघातील बचत गटांच्या वतीने तसेच साऊ एकल महिला पुनर्वसन समिती व मिशन वात्सल्य शासकीय समितीच्या वतीने गणेश मुदगुले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी पंचायत समितीचे प्रभाग समन्वयक अशोक रासकटला, क्रांती महिला ग्रामसंघाच्या प्रशिक्षण सल्लागार शालिनी ससाणे, सदस्या ज्योती सबनीस, सुनीता बनसोडे, समूह संसाधन व्यक्ती सलमा शेख, बँक सखी समिना शेख यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करताना साळवे म्हणाले, शासकीय अर्थसहाय्य योजनांसाठी पात्र असूनही २१ हजार रूपये वार्षिक उत्पन्नाचा दाखला मिळत नसल्याने गरजूंना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागत आहे. यासाठी निराधार योजना समितीचे नूतन अध्यक्ष मुदगुले यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करावा. मुदगुले यांनी आपण समितीच्या माध्यमातून गरजूंना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच बचत गटांनी कर्ज घेऊन
घरगुती कारणांसाठी त्याचा वापर न करता मोठे उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.
मुकुंद टंकसाळे यांनी बालसंगोपन योजनेबाबत, तर बाळासाहेब जपे यांनी विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनांबाबत उपस्थित महिलांना सविस्तर मार्गदर्शन केले.
बचत गटासाठी स्वतंत्र कक्ष देणारी शिरसगांव ही जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत असून महिलांची संख्या वाढल्याने सभागृह बांधून देण्याची सूचना सबनीस यांनी केली.
श्रीरामपूरच्या संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल गणेश मुदगुले यांचा शिरसगाव येथील महिला मेळाव्यात सत्कार करताना मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, मुकुंद टंकसाळे. यावेळी बचत गटाच्या महिलांनीही मुदगुले यांचा सत्कार केला.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment