अजीज शेख / राहाता
आज मकरसंक्रांती चे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात चांदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.पुंड सर यांनी सांगितले की आयुष्यमान गोल्डन कार्ड चे उद्दिष्ट एकुण २८५०७ आहे आणि आतापर्यंत १६ गावांच्या माध्यमातून १४४१४ गोल्डन कार्ड देण्यात आले आहेत. आज प्रत्येक गावात याबाबतीत कॅम्प आयोजित करुन माहिती दिली जात आहे. आयुष्यमान गोल्डन कार्ड बरोबरच राष्ट्रीय कर्करोग तसेच हिवताप व कुष्ठरोग कार्यक्रम आयोजित करुन १००% यशस्वी केला आहे. त्याच बरोबर मातृवदंन योजनेलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. आणि या विविध उपक्रमास चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारीवर्ग व ग्रामस्थांचे योग्य ते सहकार्य मिळत आहे. मकर संक्रांतीच्या निमित्ताने कालच आरोग्य केंद्रात तिळगूळ वाटप हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पुंड तसेच डॉ. आर. एस. एस पुंड, औषध निर्माण अधिकारी व्ही.पी. खंडागळे, आरोग्य सहाय्यिका के. व्ही शिंदे, आरोग्य सहाय्यक डी.अ.पोळ, व्ही. व्ही सयभोग तसेच संतोष जावळे, थोरात, दहातोंडे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी चांदा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सेवकांनी अथक परिश्रम घेतले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अजिजभाई शेख - राहाता*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment