राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Tuesday, January 9, 2024

काकर सौदागर समाजाच्या २२ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात संपन्न.💐✅🇮🇳

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

- शौकतभाई शेख -/श्रीरामपूर -
कोपरगांव तालुक्यातील भोजडे येथे काकर सौदागर समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये २२ वधू - वर जोडप्यांचे
 सामुदायिक विवाह मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
यावेळी वधू - वरांना संसारोपयोगी वस्तु भेट देण्यात
 आल्या. राज्यभरातील काकर समाज बांधव या
 शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी कोपरगांव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी वधू -:वरांना शुभेछा दिल्या. कोपरगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.देसले यांनी

नवदाम्पत्याला आशिर्वाद देत आपले मनोगत व्यक्त करताना काकर सौदागर समाजाचे विशेष कौतुक केले, तसेच काकर समाज हा मोठ्या प्रमाणात शैक्षणिक आणि व्यावसायिक दृष्टिकोन जोपासत असल्याने या समाजात गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य तथा अत्यल्प असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भोजडा (ता.कोपरगांव) येथे काकर समाजाकरीता विवाह समारंभासाठी मंगल कार्यालय (शादी हॉल) उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आ.आशुतोषदादा काळे यांच्याकडे काकर समाजाचे प्रदेशाध्यक्ष बिलाल शेठ यांनी केली .
सौदागर सोसायटी व लब्बैक ग्रुप तसेच भोजडे काकर समाजाने कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्कृष्टरित्या चांगले नियोजन केले होते याबाबत अहमदनगर जिल्हा काकर समाज संघटनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष इकबाल काकर यांनी स्वागत केले तर महाराष्ट्र काकर समाजच्यावतीने प्रदेशाध्यक्ष माजी नगरसेवक बिलाल काकर यांनी आयोजकांचे सत्कार केले.
यावेळी वैजापूरचे माजी उपनगराध्यक्ष कय्युम शेठ सौदागर, बशीर शेठ सौदागर, वैजापूरचे माजी नगरसेवक व काकर समाजाच्या प्रदेशाध्यक्ष बिलाल शेठ सौदागर, जिल्हाध्यक्ष इकबाल काकर ,वैजापूर सौदागर समाजाच्या अध्यक्ष सईद सौदागर, सौदागर एजुकेशन सोसायटीचे काजीम सौदागर, अल्ताफ सौदागर, कलंदर काकर, शामिम सौदागर सर, आजम सौदागर, श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेसचे तौफिक शेख, वैजापूर चे नगरसेवक कुरेशी, श्रीरामपूरचे ओबीसी ऑर्गनाइजेशनचे प्रदेश सल्लागार डॉ. सलीम सिकंदर शेख, मुस्लिम महासंघाचे जमील पठाण,वैजापूर चे माजी उपनगराध्यक्ष अकीलभाई शेख,चारुदत्त सिनगर तालुकाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेचे मुकुंद सिनगर, भोजडे गांव चे सरपंच सुधाकर वादे, बाबा काकर, मुख्तार काकर, हाफ़िज़ काकर ,शाहरुख पठाण, शाहनवाज शाह,आदि उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष शेख सलीम बाबुलाल काकर, उपाध्यक्ष बाबा कालु काकर,शेख शेरू दिलावर, शेख बदरु नुरा, शेख सदरू बाबूलाल, शेख बदरु शहाबुद्दीन, शेख सांडू हुसैन, शेख गुलाब शेखनूर, शेख महेबूब जाफर,शेख जावेद सांडु, शेख सिकंदर दादामिया, लब्बैक ग्रुप, सौदागर एकता सोशल सोसायटी व समस्त ग्रामस्थ भोजडे आणि महाराष्ट्र काकर समाज संघटना व काकर समाज अहमदनगर जिल्हा आदींनी विशेष परिश्रम घेतले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================



No comments:

Post a Comment