💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
- शिरसगाव - प्रतिनिधि - / वार्ता -
श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या श्रीरामपूर तालुकाध्य्क्षपदाचा पदभार गणेशराव मुदगुले यांनी सोमवारी तहसील कार्यालय श्रीरामपूर येथे जाऊन स्वीकारला. त्यावेळी तहसील कार्यालयाच्यावतीने निवासी नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे यांनी त्यांचा सत्कार केला. त्यावेळी संजय गांधी योजना नायब तहसीलदार अभया
राजवाळ,अ.का.श्रीमती निर्मला नाईक,संगणक ऑपरेटर रज्जाक बागवान,नवनाथ मंडलिक,आदी उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह विविध योजनेची सविस्तर चर्चा करून माहिती घेतली व आढावा घेतला. नायब तहसीलदार श्रीमती अभया राजवाळ यांनी सविस्तर माहिती देताना संजय गांधी निराधार योजनेसह,इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ/विधवा/अपंग निवृत्ती वेतन योजना,राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य निवृत्ती वेतन योजना,व श्रावणबाळराज्य निवृत्ती योजनाची माहिती दिली व त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय असावीत त्याचे तपशिलासह माहितीपत्रक सादर केले.
यावेळी श्री.मुदगुले म्हणाले की, महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांनी आमच्यावर विश्वास ठेवून शिरसगावसह वरील योजनेच्या तालुकाध्यक्षपदी माझी नियुक्ती केल्याने दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडीन व सामान्य जनतेपर्यंत शासकीय सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.व यापुढे सर्व प्रकरणाचा निपटारा,प्रलंबित न राहता दर महिन्याला बैठक घेऊन आलेल्या सर्व अर्जांचां विचार करून नागरिक योजना लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात
येईल असे ते म्हणाले.
=================================
-----------------------------------------------
*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment