- खोपोली - प्रतिनिधि - / वार्ता -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विविध प्रश्नांसह टोलनाक्यावर बोलणारे यांचे रविवार, ७ जानेवारी रोजी वेगळेच रूप पाहायला मिळाले. ते पुण्यावरून कार्यक्रम आटोपून मुंबईला येत असताना खालापूर टोलनाक्यावर रस्त्यावर उतरत त्यांनी तब्बल पाच किलोमीटर अंतर असलेली वाहतूक कोंडी मिनिटात सोडवून रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला.
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात रविवारी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत पार पडली. हा मुलाखत कार्यक्रम संपवून पुण्याहून मुंबईला परतत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वाहतूक कोंडीत अडकल्याचे खालापूर टोलनाक्याजवळ दिसून आले. यावेळी राज ठाकरे हे स्वतः रोडवर उतरले. त्यांनी त्यांच्या खास ठाकरे शैलीत संबंधित अधिकाऱ्याला सुनावले. यावेळी
राज ठाकरे स्वतः टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी येथील अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारला. विशेष म्हणजे यलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी टोलनाक्यावर उतरून स्वतः सर्व वाहतूक कोंडी सोडवली. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला त्यांनी रस्ता करून दिला आहे.
राज ठाकरे यांनी वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला रस्ता करून दिला. पुण्यावरून मुंबईला येताना वाहतूक कोंडीमुळे राज ठाकरे टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम भरल्याचे दिसून आले.
राज ठाकरे यांनी पिंपरी- चिंचवडमधील नाट्य संमेलनाला हजेरी लावली. नियोजित कार्यक्रम संपवून ते मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे त्यांना दिसून आले. यावेळी
राज ठाकरे स्वतः टोलनाक्यावर उतरले आणि त्यांनी येथील अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीबाबत प्रश्न विचारला. विशेष म्हणजे यलो लाईनच्या बाहेर जर गाड्या असतील तर त्यांना सोडण्याचा नियम असतानाही त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. त्यानंतर त्यांनी टोलनाक्यावर उतरून स्वतः सर्व वाहतूक कोंडी यावेळी सोडवली वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका रुग्णवाहिकेला त्यांनी रस्ता करून दिला होता.
=================================
-----------------------------------------------
: - रिषभ पालिकर - संकलन - वार्ता. ✍️✅🇮🇳...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment