*महतीश्रीजी असे झाले नामकरण*
चाळीस वर्षांनंतर श्रीरामपुरात*
*जैन भागवती दीक्षा महोत्सव
- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील जैन समाजातील २१ वर्षांची बी.ए. सायकॉलॉजीचे शिक्षण घेतलेली मोक्षा प्रशांत चोपडा हीचा जैन भागवती दीक्षा महोत्सव ११ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील जैन संत साध्वी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी मोक्षा हिला साध्वीचा वस्त्र परिधान करून नामकरण विधी करण्यात आला. मोक्षा आता 'प प पु महतीश्रीजी म सा ' या नावाने ओळखली जाणार आहे.
मोक्षा ही व्यापारी नेमीचंद माणकचंद चोपडा यांची नात व उद्योजक प्रशांत व सौ. प्रिती प्रशांत चोपडा यांची कन्या आहे. मोक्षा हिने तीन चातुर्मास केले असून अनेक वेळा श्रीरामपूर चेन्नई बंगळुरू, बीड, जामखेड, छत्रपती संभाजीनगर असा सुमारे तीन हजार किलोमीटर प्रतिभाकंवरजी यांच्या सोबत पायी प्रवास केला आहे. जैनधर्मियात लहान वयापासूनच धार्मिक शिकवण दिली जाते. दहावीला असताना कुटुंबीयांसोबत जालना येथे गुरू प्रतिभाकंवरजी यांचा पहिल्यांदा सहवास लाभला. तेव्हापासूनच दीक्षा घेण्याचे विचार मोक्षा करत होती. जैन भागवती दीक्षा महोत्सवा निमित्त जैन स्थानकात १ ते ११ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोक्षा चोपडा हि नवकार आराधिका प्रतिभाकंवरजी व आयंबिल तप आराधिका जिनशासन प्रभावीका प्रफुल्लाजी आदि साध्वी मंडळच्या सानिध्यात महाराष्ट्र प्रवर्तक कुंदनऋषि यांच्या अरविंदाने दीक्षापाठ अंगीकारुन जैन साध्वी झाली.
दिक्षा महोत्सवासाठी जैनसाधक सौरभमुनि, युवा प्रणेते गौरवमुनि, शालिभद्र, प्रणवमुनि, सार्थकमुनि व सक्षममुनिजी आदि संत महात्म्याच्या समवेत नवकार आराधिका प्रतिभा,आयंबिल आराधिका प्रफुल्ला आदीसह साध्वी मंडळ तसेच महाराष्ट्र चेन्नई बेंगलोर आधी राज्यातील हजारो जैन महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४० वर्षापूर्वी सुमिता (कोपरगांव) व सुनेता (केडगांव, पुणे) यांची दीक्षा श्रीरामपूर येथे झाली होती. आता श्रीरामपूरची कन्या मोक्षा चोपडा हिची जैन भागवती दीक्षा करण्याचे भाग्य लाभले आहे. तसेच अंजली ही माजलगांव येथे २८ एप्रिल रोजी दीक्षा घेणार आहे.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार दीपक कदम -श्रीरामपूर*
==============
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment