राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, February 12, 2024

अशोकनगर येथील अशोक स्टेडियमवर आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धा संपन्न


अशोक पाॕलिटेक्नीक महाविद्यालयास विजेतेपद तर परिक्रमा पाॕलिटेक्निक महाविद्यालयास उपविजेता

- श्रीरामपूर - प्रतिनिधि - / वार्ता 
महाराष्ट्र राज्य तंञशिक्षण मंडळाच्या विद्यमाने आयोजित आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धेत अशोक पाॕलिटेक्निक महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले तर परिक्रमा पाॕलिटेक्निक महाविद्यावयास उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विभागीय विजेतेपद मिळाल्याने अशोक पाॕलिटेक्निकचा संघ कल्याण येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करेल.
    तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक स्टेडीयमवर संपन्न झालेल्या या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे हस्ते व कोंडीराम उंडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, संचालक सोपानराव राऊत, हिंमतराव धुमाळ, संचालिका तथा शिक्षण संस्थेच्या समन्वयक सौ.मंजुश्री मुरकुटे, तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भास्कर खंडागळे आदी उपस्थित होते.    
              याप्रसंगी बोलताना माजी आ. श्री.मुरकुटे म्हणाले की, खेळामुळे आनंद मिळतो तसेच मनही प्रसन्न राहाते. खेळात यश अपयश असतेच. त्यामुळे अपयश आले म्हणून नाउमेद न होता झालेल्या चुका, उणिवा दूर कराव्यात. खेळात भेदभाव नसतो तर सर्व समान असतात. मला खेळाची आवड असून या वयातही मी मैदानात असतो, असे त्यांनी आवर्जून सांगीतले.
               तत्पूर्वी अंतिम सामन्यात अशोक पाॕलिटेक्निकने आठ षटकांत ७६ धावा केल्या. फरदिन पठाण व दिनेश ठोबळे यांनी प्रत्येकी १६ धावांचे योगदान दिले. उत्तरादाखल परिक्रमा संघाचा डाव ६५ धावसंख्येवर गडगडाला. निखिल शेलार याने १६ धावा करीत एकाकी झुंज दिली. अशोक पाॕलिटेक्निकने अंतिम सामाना १२ धावांनी जिंकून विजेतेपद पटकावले. पंच म्हणून सुधा तावडे व राहुल विसपुते यांनी काम पाहिले. प्राचार्य आंजाबापू शिंदे यांनी प्रास्तविक केले तर उपप्राचार्य अरुण कडू यांनी सूञसंचलन केले. 
अशोकच्या संघास सचिन कोळसे, अक्षय मगर व प्रताप राऊत तर परिक्रमा संघास अशोक राहिंज, रविन्द्र काळावे या प्रशिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी अध्यापक तसेच क्रीडा रसिक उपस्थित होते.

=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजु मिर्जा*
(ब्यूरो चिफ: नाशिक विभाग)
===================
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment