- श्रीरामपूर,- प्रतिनिधि -/ वार्ता -
अशोक कारखाना संचालित माजी आमदार लोकनेते भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार (दि.१५) रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेचे संस्थापक माजी आमदार भानुदास मुरकुटे आणि ज्येष्ठ कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्र.प्राचार्या डॉ. सुनिताताई गायकवाड यांनी दिली.
तालुक्यातील अशोकनगर येथील निवृत्तीभाऊ बनकर सांस्कृतिक भवन येथे या पारितोषिक वितरण समारंभाचे आणि वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अशोक सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सुरेश गलांडे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष योगेश विटनोर, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव सोपानराव राऊत, रा.यु.काँ. माजी जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ मुरकुटे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कार्यकारी अधिकारी सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, जि.प.माजी सदस्य मिलिंद गायकवाड, अशोक बँकचे चेअरमन ऍड.सुभाष चौधरी, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव भास्कर खंडागळे, कार्यकारी संचालक संतोष देवकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ.सुनीताताई गायकवाड, उपप्राचार्य सुयोग थोरात, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा.सुनील म्हांकाळे, प्रा. दिलीप खंडागळे, कार्यालयीन अधीक्षक बाबासाहेब पटारे आदींनी केले आहे.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment