- पाथर्डी - प्रतिनिधि -/ वार्ता -
कासार पिंपळगाव: आदिनाथनगर येथील श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्थेचे- दादा पाटील राजळे कला आणि विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर, तालुका: पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर येथे वाणिज्य शाखा आणि अर्थशास्त्र पदवी व पदवीव्युत्तर विभागांतर्गत
"केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५" या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. याकरिता मा. प्रा. डॉ . श्री. अजय पालवे (अर्थशास्त्र विभाग प्रमुख तसेच एनसीसीचे सर्वेसर्वा) बाबुजी आव्हाड महाविद्यालय पाथर्डी, जिल्हा: अहमदनगर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्प आणि महाविद्यालयाचे नियतकालिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विविध करांच्या माध्यमातून शासनानला मिळणारे उत्पन्न शासन पायाभूत सुविधांच्या विकासावर तसेच लखपती दीदी उपक्रम, आरोग्यसेवा, आवास योजना (गृहनिर्माण) ,शेतकरी सन्मान योजना, सर्वसमावेशक वाढीवर लक्ष इत्यादी योजनांसाठी कशाप्रकारे खर्च करते याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना सांगितली .
व्याख्यानाचे यशस्वी आयोजन करण्याकरिता मा. डॉ. सुभाष जगन्नाथ देशमुख,(अर्थशास्त्र पदवी व पदव्युत्तर विभाग तसेच वाणिज्य शाखाप्रमुख), प्रा. श्रीमती अर्चना नवले, रामेश्वरी सरोदे, स्वाती सातपुते, कुमारी तेजस्विनी तिजोरे, कुमारी प्रीती माळवदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना २ क्रेडिटसाठी या परिसंवादाचा उपयोग होणार आहे.
या व्याख्यानात वाणिज्य शाखेतील ३३ तर प्रथम वर्ष कला अर्थशास्त्र विषयाच्या १४ विद्यार्थ्यांनी म्हणजे एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यक्रमाचे आयोजन करताना शिक्षण संस्थेचे सचिव मा. जे. आर. महाजन, शिक्षण संस्थेचे संचालक माननीय आमदार मोनिकाताई राजळे, माननीय श्री राहुल राजळे, मा. प्राचार्य डॉ. राजधर ज. टेमकर, माननीय श्री विक्रमराव राजळे (अधीक्षक) आदींचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
=================================
-----------------------------------------------
*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment