राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, April 1, 2024

इस्लाम समजून घेताना " मालिका.रमजानुल मुबारक


रोजा नं २१ वा 
सोमवार दि.०१-०४- २०२४
=================================

 !!! रोजा :- जकात :- दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना अर्थिक सामाजिक उन्नतीसाठी !!

प्रेषित मुहम्मद स्व. सल्लमांनीं फितरा व जकात ला रमजान महिन्यातील रोजा मध्ये लोकसमुदयावर अनिवार्य केलेले आहे , जेणेकरून रोजांच्यां स्थितीत रोजंदारांकडून घडणाऱ्या व्यर्थ आणि पापांच्या गोष्टींचे प्रायश्चित्त व्हायला पाहिजे, गरजवंताच्यां व गरीबांच्या भोजणाचे नियोजन व्हावे.( अबु दाउद शरीफ).
                                  आज जगात विविध देशांमध्ये धर्मयुद्ध- सिव्हिल वार- युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध चालू आहेत, बरेच आफ्रिकन देशात गृह युद्ध चालू आहेत व बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला नाही यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.. फारच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे 
तसेच हल्ली सध्याला इस्रायली सैनिकांनी पॅलेस्टाईन देशाच्या बळाच्या जोरदार बऱ्याच ठिकाणी कब्जा करुन पॅलेस्टाईन लोकांच्या चालवलेल्या अमानुष अमानवीय अत्याचार व हत्याकांडाला पारावरच उरला नाही तेथिल लाखोंच्या संख्येने नाहक बळजबरीने नागरिक मारले जावुन त्यांची घरे जमिनदोस्त करण्यात येत आहेत , त्या जमीनदोस्त बिल्डिंग खाली आडकून मरण पावलेल्यांची संख्या तर अगणित आहे, तर त्यांचे लहान मुलं भुकेने कासावीस- व्याकुळ होऊन सैरावैरा जेवणासाठी पळत आहे. किती महीने झाले आता UNO व अमेरिका हे ज्यु यहुदी लोकांच्या ताब्यात असल्याने त्यांच्या कडे कुणी लक्ष देण्यास तय्यार नाहीत,काही काही तर झाडाच्या पानावर रमजानुल मुबारक चे रोजे सेहरी व इफ्तार करत आहेत.काही लहान बाळाला फक्त दिवसभरात एक चिप्स चं पाकीट , एखाद्या बिस्किटे पुड्या वर दिवसभर उपवास करावा लागत आहे ,फारच भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे त आशा बिकट परिस्थिती तेथिल एका काळातील करोडपती लोकं बरबाद झालेली आहे व गरीबांना तर कोणीही वाली नाहीत परिस्थिती लिखाण करण्या- पलीकडे झालेली आहे काय लिहावं व काय सोडावं हेच मुळात समजत नाहीत आशी बोलण्या व लिहीण्याच्या पलीकडे बिकट अवस्था झालेली आहे..त्यामधेच इस्रायली सैनिक व सरकार त्या मजबूर पॅलेस्टाईन लोकांना जेवण जावू देत नाहीत एवढं निर्दयी काळजांचे इस्रायली अल्लाह तर नक्कीच त्यांना त्यांनी केलेल्या भिषण नरसंहार हत्याकांडाला काय प्रायश्चित देईलच परंतू जगातील बंधुंनी आप आपले कर्तव्य जरूर करावेत ... अल्लाह त्याच्या २० 
पट किंवा अनेक पटींनी जास्त परतफेड करणारा आहेत. आगोदर पण तुम्हाला त्यानेच दिलं होतं हे विसरून चालणार नाही .
                   # दिव्य कुर'आन -अल्लाह कळकळीने सांगतात की, " तुमची मालमत्ता व तुमची संतंती एक कसोटी आहे ,! अल्लाह च त्याचा मोबदला देणारा आहे ; तर अल्लाहच्या मार्गात आपली मालमत्ता खर्च करावा , ; हे तुमच्या साठी उत्तमच आहे ; कोणी आहे का? अल्लाहाला उत्तम कर्ज देणारें ! असतील तर ; अल्लाहाला कर्ज द्या !! जर तुम्ही अल्लाहाला उत्तम कर्ज दिले, तर, तो तुम्हाला कित्येक पटीने वाढवून देईल आणि तुमच्या चुकांना माफ करील अल्लाह मोठा कदर करणारा व सहनशील आहे. " ( दिव्य कुरआन पारा नंबर २८ ,सुरत ६४ वी , अल- तगगाबुन आ.न.१४,१५,१६,१७ .).#@
अल्लाहाला काय गरज आहे कर्ज घेण्याची.कारण ते परिक्षा बघत असतात , त्यांना कर्ज पाहिजे ते आपल्या तील बेसहारा लोकांना वाचवण्यासाठी, त्यांच्या जीवू घालण्यासाठी, आर्थिक मदत देण्यासाठीच, 
      मग ते कोणासाठी ? .
            # नातेवाईक ,अनाथ, पीडित शेजाऱ्यांच्यवर खर्च करावा .(अन-निसा अ.नं.३६ )
              # निराधार , अपंग लोकांवर खर्च करावा .( अल-जारियात अ.नं.१० )
               # बिगर इंटरेस्ट कर्ज देणे. ( विना व्याजदराने कर्ज देणं , यामधे कर्ज घेणाऱ्यांनी ठराविक मुदतीत रक्कम आणुन जमा करणं)
            # जे लोक पीडित आहेत एखाद्या नैसर्गिक आपत्तीने , भूकंपग्रस्त, धरणग्रस्त ,सुनामी , एखादी जीवघेणी साथीचा आजार , दुष्काळी परिस्थिती , आणिबाणीच्या संकट परिस्थिती, पीडितांसाठी , अनाथांच्या भल्यासाठी , विधवांच्या उद्धारासाठी व विधवांच्या मुलाबाळांचां सांभाळ करण्यासाठी जकात अवश्य देण्यात यावी. ,. जे गरीब आजारी आहेत व आजारपणाचा उपचारासाठी पैशाच नाहीत , ज्याच्याकडे हॉस्पिटल बिल भरण्याची ऐपत नाही अशांसाठी जकात देण्यात यावी.
ज्याच्यांवर कर्जदारांचे कर्ज आहे ; कर्ज भरण्याची ऐपत नाही ; अशांसाठी जरूर जकात देण्यात यावी. तसेच गरीब मुलींचे लग्न करण्यासाठी व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी संपूर्णपणे करण्यासाठी , जकात अवश्य देण्यात यावी. 
   # आतिविशेष बाब म्हणजे ;- ,माणूस कितीही मोठा असला तरी तो एखाद्या वेळी संकटात सापडलेला असतो व आशा वेळी तो संपूर्ण तंगीत असतो, आर्थिक स्थिती फार कठीण झालेली असते , इकडे मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था ही करायची असते ,तर आशा वेळी कुणाकडून तरी हात उसने किंवा खाजगी सावकाराकडून कर्ज घेतलेले असते . ते कर्ज फेडण्यासाठी बिलकुल काहीच पर्याय सापडत नाहीत अशांना जकातीचा चांगला उपयोग होतो .कारण समाजात अशी प्रामाणिक माणसं आपल्या स्वाभिमाना खातर भीक मागू शकत नाहीत ; आशा आर्थिक डबघाईस आलेले हाजारों संख्येने असतात आशा वेळी काही कोवळ्या मनाचे लोकं आत्महत्या देखील करतात तर काही संयम पाळून वाट पाहत असतात तर आशांसाठी गुपचुप त्यांना जकात देण्यात यावी. त्यांचा स्वाभिमान ही राहील व त्यांची आणिबाणीच्या परिस्थिती ही निघून जाईल.!!
         # तसेच शाळा, कॉलेजच्या वाढीसाठी व ‌शाळेतील लायब्ररी व मुलांच्या शैक्षणिक फी देण्यासाठी ही जकातीचा हिस्सा देउन शैक्षणिक स्थिती उंचावण्यास मदत ही होईल .
  # भारतामधे इस्लामी पद्धतीने विविध प्रकारच्या शाळा चालवली जातात त्या शाळांना" मदरसा" म्हणतात.
  #@ सोशल मेडीयांवर मुस्लिम विरोधी टि व्ही चॅनल्स नी मदरशांबददल गैरसमज व द्वेष निर्माण करून इतर समाजातील लोकांचे दिशाभुल केली आहे व जाते.@#
  # त्यामध्ये मदरशांमधे अरबी , उर्दू भाषेत शिक्षण देशभक्तीसह इस्लामी शिक्षणासह राज्यांंच्या कायद्यानुसार स्थानिक पातळीवरील शिक्षण दिले जाते. 
       @# आज लाखोंच्या संख्येने अरबी मदरशांमध्ये शिक्षणाबरोबरच गरीब ,अनाथ ,विधवा, मुलं शिखत असतात तर त्यांच्या वस्तीगृहात जेवणाखाण्याची सोय जकातीच्या पैशातूनच केलेली असते.
त्या बरोबरच अनाथ, गरीब ,विधवा, मुलांच्या विवाह साठी मदरशांमधे सोय केली जाते अशामध्ये जकातीचा वापर केला जातो . आशा मदरशांमधे आपल्या जकातीच्या पैसा देऊन सदुपयोग जरूर करावं.
          #@ अशा मदरशांमधे शिकलेली गरीबांची मुलं भारतामधे व जगात विविध ठिकाणच्या दुष्काळी परिस्थितीत , पुरग्रस्त परिस्थितीत , समाजोपयोगी उपक्रमाला मदत लागेल तिथे स्व: खुशीने जाऊन मदत देतात. उदा..पाणी- अन्नधान्य पुरवणं , नद्या-नाल्यामधे कोणी वाहत असेल तर ; मदशातील मुलं उडी मारून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता केवळ सबाब ,पुण्यंच काम म्हणून समोरच्या पीडीतेला वाचवतात ..हे अनेक बिकट परिस्थितीत ठिक-ठिकाणी बघायला मिळाले आहेत ..
                         जकातींचं व्यवस्थित नियोजन करून गरीब -गरजुंच्या अर्थ व्यवस्थेची उन्नती व आर्थिक स्थिती व स्तर उंचावण्यासाठी नक्कीच मदत होईल.
       #@ म्हणूनच दिव्य कुर'आन मधे अल्लाह आपल्याला सांगतात की, " कोण आहे जो अल्लाहाला उत्कृष्ट कर्ज देईल ; जेणेकरून अल्लाह कितेक पटीने वाढवून परत करील आणि त्यांच्या साठी तो उत्तम मोबदला असेल." ( पारा नं.२७ , सुरह नं. ५७ , सुरह अल- हदीद अ.नं.११ वी .).#@
सर्व गरजू लोकांना अल्लाह ने कर्ज घेउन , त्यांना त्यांच्या परतफेडीच्या उत्तम मोबदल्या सह .दिले आहेत.
        ‌ असं म्हणतात की, " देणाऱ्यांचे हात हे ; घेणाऱ्यांच्यां हातांपेक्षा चांगले असते "


=================================
-----------------------------------------------

     ‌‌( मित्रांनो लेख आवडला तर मित्रांना अवश्य पाठवा. आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.).


लेखन : डॉ सलीम सिकंदर शेख✍️✅🇮🇳
बैतुशशिफा हॉस्पिटल 🎉
श्रीरामपूर 🎉
🎉 ९२७१६४००१४ 🎉

@डॉ @ स @ ली‌@म@शे@ख@🌹
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment