राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, April 1, 2024

ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरिजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वर्धा -
श्रीक्षेत्र चिंचडगाव येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमात श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या प्रेरणेने व महंत राजेश्वरगिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरिजी महाराज यांच्या १५ व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थांनच्या वतीने देण्यात आली आहे.
           सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने व बेटाचे महंत रामगिरी महाराजांच्या प्रेरणेने व नारायणगिरीजी महाराज आश्रमचे महंत राजेश्वरगिरिजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताह सुरू असून या कालावधीत सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णू सहस्त्रनाम, सकाळी ८ ते ११ संगीत गाथा पारायण, सकाळी ०९:३० ते १० अल्पोहार, दुपारी १२ महाप्रसाद, दुपारी २ ते ५ संगीत पारायण, ५ ते ६ हरिपाठ आणि सायंकाळ ७ ते १० श्रीमद् भागवत कथा असे दैनंदिन कार्यक्रम होणार असून बुधवार दि.३ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत आश्रमचे महंत राजेश्वरगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार असून यावेळी श्रीक्षेत्र सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज सदिच्छा भेट देणार असून उपस्थित भाविकांना वैजापुरचे आमदार रमेश बोरनारे सर व के. टी.तांबे परिवाराच्या वतीने महाप्रसाद देण्यात येणार आहे. तरी या कालावधीत परिसरातील भाविक भक्त मान्यवर पत्रकार भजनी मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सद्गुरु नारायणगिरीजी महाराज आश्रमच्या वतीने करण्यात आले आहे.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार संदिप आसने - माळवाडगांव*
================
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment