राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Monday, April 1, 2024

शिवम पटारेमुळे श्रीरामपूर तालुक्याच्या नावलौकीकात भर; माजी आ.मुरकुटे


- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असलेल्या शुभम पटारे याने प्रो कब्बड्डी स्पर्धेत हरियाणा स्टिलर्स संघास आपल्या उत्तम खेळाने उपविजेतेपद मिळवून दिले. शुभमच्या नेञदिपक कामगिरीने श्रीरामपूर तालुक्याच्या नावलौकीकात भर पडल्याचे प्रतिपादन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले. अशोक उद्योग समुहाच्या वतीने टाकळीभान येथील शुभम पटारे याचा सत्कार करण्यात आला. शुभम पटारे हा अशोक महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. त्याने आपल्या नेञदिपक कामगिरीने हरियाणा स्टिलर्स संघास रौप्यपदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याचा व त्याचे वडील श्री.अनिल पटारे यांचा अशोक उद्योग समुहाच्यावतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अशोक कारखान्याचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, संचालक कोंडीराम उंडे, हिम्मतराव धुमाळ, यशवंत रणनवरे, संचालिका सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, माजी व्हा. चेअरमन दत्ताञय नाईक, कारेगाव भागचे संचालक शिवाजी शिंदे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, संचालक मंडळाचे सदस्य आदी उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*पत्रकार राजू मिर्जा*
ब्युरो चीफ - नाशिक विभाग
-----------
*संकलन*✍️✅🇮🇳
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment