अहमदनगर प्रतिनिधि वार्ता
(२७ मे) काल दहावीचा निकाल लागला. अहमदनगर जिल्ह्याचा निकाल ९४.५६ टक्के लागला. जिल्ह्यात पारनेर तालुक्याने बाजी मारली. पारनेर तालुक्याचा निकाल सर्वाधिक लागला. दरम्यान जिल्ह्यात एकूण ६५५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९२.९१ टक्के मुले, तर ९६.६१ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
दरम्यान आता विद्यार्थ्यांना प्रवेशाचे जास्त संताप घेण्याची गरज नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकूण ६५५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, अकरावीसाठी उपलब्ध प्रवेश क्षमता ही ८६ हजार आहे, शिवाय आयटीआय व इतर अभ्यासक्रमांसाठीही प्रवेश मिळणार आहे.
जिल्ह्यातील १८१ परीक्षा केंद्रावर १ ते २६ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा झाली. त्यासाठी ६९ हजार २६५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ६५ हजार ५०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीनंतर विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत प्रवेश घेतात.
काही विद्यार्थी आयटीआय, तंत्रनिकेतनसारख्या अभ्यासक्रमांचीही निवड करतात. जिल्ह्यात उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, एवढी प्रवेश क्षमता असल्याचे शिक्षण शाखेवार्डज प्रवेश क्षमताविभागाने स्पष्ट केले आहे.
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediy Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment