राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 7, 2024

श्रीरामपूर तालुक्यातील४४ हजार महिला पात्रमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना समितीची बैठक; उद्या प्रमाणपत्र वाटप


श्रीरामपूर...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ स्तरावरील समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप महिला मोर्चाच्या तालूकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे, सदस्य अभिषेक खंडागळे, पुष्पलता हरदास यांचा सत्कार करताना तहसीलदार मिलिंदकुमार वाघ. समवेत मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढोकचौळे, नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, सहायक गटविकास अधिकार  उस्मान .
शेख.
<^><^><^><^><^><^><^><^><^><^><^><^>
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷•÷÷÷÷÷÷÷÷
=================================

- श्रीरामपूर - प्रतिनिधि -/ वार्ता -
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत श्रीरामपूर तालुक्यातून आतापर्यंत ४६ हजार २४५ अर्ज दाखल झाले आहेत. यापैकी ४४ हजार १२६ महिलांचे अर्ज प्राथमिक स्तरावर पात्र ठरले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर तालुक्यात युद्ध पातळीवर सुरू आहे. यासाठी भाजप महिला मोर्चाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीची पहिली बैठक मंगळवारी सायंकाळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या दालनात झाली. यावेळी वाघ यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंची माहिती दिली. श्रीरामपूर तालुक्यातून आतापर्यंत ४६ हजार २४५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी संगणकावरील अर्ज, कागदपत्रांच्या आधारे ४४ हजार १२६ महिलांचे अर्ज प्राथमिक स्तरावर पात्र ठरले आहेत. १८ अर्ज अपात्र ठरले आहेत. तर १ हजार ९६८ अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. त्यांना दुरूस्ती व त्रुटी पुर्ततेसाठी एक संधी मिळणार आहे, असे समितीचे सदस्य सचिव तथा तहसीलदार वाघ यांनी बैठकीत सांगितले. 
यावेळी नवनियुक्त सदस्य पुष्पलता हरदास, अभिषेक खंडागळे यांच्यासह भाजपचे शहर उपाध्यक्ष व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढौकचौळे, सहायक गटविकास अधिकारी उस्मान शेख यांच्यासह बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांनी स्वागत केले. 
योजनेचा श्रीरामपूर तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी समिती प्रयत्न करणार आहे. प्राथमिक स्तरावर पात्र ठरलेल्या अर्जांची छाननी होऊन त्यांना समितीची मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर ही यादी जिल्हा स्तरावरील समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या मंजुरीनंतर महिला व बालविकास आयुक्तांच्या समितीकडे पात्र अर्ज पाठवून अंतिम मंजुरी दिली जाणार आहे, असे समितीच्या अध्यक्षा मंजुषा ढोकचौळे, सदस्य अभिषेक खंडागळे व पुष्पलता हरदास यांनी सांगितले. शहर व ग्रामीण भागातील अर्जांचा ताळमेळ लावण्यासाठी नागरी व ग्रामीण बालविकास प्रकल्पांमध्ये समन्वयक साधण्याची सूचना मिलिंदकुमार साळवे यांनी केली. तर योजनेच्या लाभासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, तसेच इतर प्रकारे होणाऱ्या फसवणुकीस महिलांनी बळी पडू नये , असे आवाहन अभिषेक खंडागळे यांनी केले.
 पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते योजनेच्या काही लाभार्थी महिलांना गुरूवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता थत्ते मैदानात होणाऱ्या सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात मंजुरी प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. याप्रसंगी तालुक्यातील महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन मंजुषा ढोकचौळे, अभिषेक खंडागळे, पुष्पलता हरदास, मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब हरदास, मेजर महेश ढोकचौळे यांनी केले आहे.

*समिती अध्यक्षपदी मंजुषा ढोकचौळे*
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी व सनियंत्रण करण्यासाठी पालकमंत्री विखे पाटील यांच्या शिफारशी नुसार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष मंजुषा ढोकचौळे यांची समितीच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा पुष्पलता हरदास व श्रीरामपूर बाजार समितीचे उपसभापती तसेच बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे यांची समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा सरचिटणीस नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष दीपक पटारे, शहराध्यक्ष मारूती बिंगले, अनिता शर्मा, पूजा चव्हाण, सुप्रिया धुमाळ, कविता दुबे व इतरांनी अभिनंदन केले आहे.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================







No comments:

Post a Comment