राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 7, 2024

शेतकरी युवक संवाद यात्रा,निपाणी वडगावात युवकांची जंगी मोटार सायकल रॅली


करण ससाणे आणि हेमंत
ओगलेंचे केले भव्य स्वागत

- शौकतभाई शेख - श्रीरामपूर -/ वार्ता 
श्रीरामपूर - फटाक्यांची आतषबाजी करत करण ससाणे, हेमंत ओगले आगे बढोच्या घोषणा देत तालुक्यातील निपाणी वडगाव येथील युवकांनी जंगी मोटार सायकल रॅली काढत करण ससाणे आणि हेमंत ओगले यांचे भव्य स्वागत केले. दरम्यान ही रॅली अशोक कारखान्याच्या गेस्ट हाऊस जवळील डॉ. बाबासाहेब आबेंडकर चौकातुन काढून संपूर्ण गावात फिरवण्यात आली. या संवाद यात्रेत अनेक शेतकरी आणि युवकांनी आपल्या समस्या मांडल्या.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन तेथील शेतकरी, युवक आणि जनतेसोबत संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आणि काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणिस हेमंत ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी युवक संवाद यात्रा काढण्यात आली असून यात्रेच्या पाचव्या दिवशी करण ससाणे आणि हेमंत ओगले यांनी सकाळच्या सत्रात श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव, खिर्डी, तर दुपारच्या सत्रात कारेगाव, मातापूर, निपाणी वडगाव येथील ग्रामस्थां समवेत संवाद साधला.
निपाणी वडगाव येथे झालेल्या सभेत मनोगत व्यक्त करताना मुरली राउत यांनी स्व. जयंतराव ससाणे यांच्या आठवणींना उजाळा देत मागील दहा वर्षात आम्ही पोरके झालो असुन आम्हाला आधाराची गरज आहे. स्व. जयंतराव ससाणे होते तेव्हा गावातील गोरगरीब समाजाचा माणुस त्यांनी दत्तक घेतला होता. तोच वारसा तुमच्याकडे असल्याने आम्ही पुढारी बदललो तरी तुम्ही बदलु नका असे भावनीक अवाहन त्यांनी करण ससाणे यांना केले. गावाबद्दल काळजी करायच काम नाही. आम्ही सर्वच तुमच्या सोबत आहोत त्यामुळे करण ससाणे सांगतील तोच आमचा नेता असेही ते म्हणाले. यावेळेस युवक काँग्रेस चे गणेश गायधणे व प्रशांत राऊत यांनी शेकडो युवकांना बरोबर घेऊन भव्य मोटार सायकल रॅली काढली.कष्टकरी, शेतकरी माता भगिनी युवकांच्या सन्मानासाठी शेतकरी युवक संवाद यात्रेनिमित्त आवाज तुमचा संपर्क आमचा हे ब्रिद वाक्य घेऊन, मतदारसंघातील अंतिम घटकापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी व त्यांच्या सोबत संवाद साधण्यासाठी शेतकरी युवक संवाद यात्रा सुरू केलेली आहे. तालुक्यातील गावांच्या समस्या जाणून घेऊन यात्रेच्या शेवटी सर्व समस्यांचे एकत्रीकरण करून एकत्रीत समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.जिल्हा बँकेचे संचालक मा. उपनगराध्यक्ष करण ससाणे म्हणाले की, भविष्यात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहून श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस पक्षाचा तसेच स्व. जयंतराव ससाणे यांचा बालेकिल्ला असल्याची ओळख कायम ठेवा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले
दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे सरचिटणिस हेमंत ओगले म्हणाले की, निष्क्रीय लोकप्रतीनिधी आल्याने गावांच्या समस्या सुटल्या नाहीत. श्रीरामपूर एमआयडिसीत परप्रांतीय तरुण काम करतात भुमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहीजे हि आमची भुमिका असून याचा जाब विचारला जाईल. तसेच इतर बंद कंपन्या चालु करण्यासाठी प्रयत्न करून रोजगाराची निर्मिती केली जाणार आहे. तसेच शेतीसाठीच्या विजेचे प्रश्न, शेतीमालाला भाव, दुधाचे दर आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे श्रीरामपूर जिल्हा झाला पाहीजे याबाबत आवाज उठवला जाणार आहे. यावेळी शेतकरी युवक संवाद यात्रेतील सभेत युवक, शेतकरी, आणि ससाणे समर्थकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment