केंद्र सरकारने निवडणूकीपूर्वी
निर्णय घ्यावा - पोखरकर
- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
रविवार दि.११/८/२०२४ रोजी सकाळी ११:३० वा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, टिळक रोड,अहमदनगर येथे जिल्ह्यातील ईपीएस पेन्शनर मेळावा संपन्न झाला.सर्व तालुक्यातील पदाधिकारी व पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षस्थानी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष देविसिंग अण्णा जाधव होते, अजितकुमार घाडगे (समन्वयक, पुणे जिल्हा), .ईंद्रसिंग आप्पा राजपूत (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड). सुभाषराव पोखरकर (संघटक पश्चिम भारत) यांची विशेष उपस्थिती होती.
राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांचे नेतृत्वाखाली दिल्ली येथे दि.३१ जुलै रोजी झालेल्या ध्यानाकर्षण आंदोलनाबाबत व संघटनेचे चालू असलेल्या प्रयत्नाबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. केंद्र सरकारने पेन्शन प्रश्नी ३१ ऑगस्टपूर्वी निर्णय न घेतल्यास पेन्शन धारकांचा असंतोष सरकारला निश्चित महागात पडेल.शहराध्यक्ष संजय मुनोत यांचे सुचनेनुसार. दिल्ली आंदोलनात सहभागी झालेल्या पेन्शन धारकांचा सत्कार करण्यात आला. खासदार निलेश लंके व खासदार भाऊसाहेब वाकचौरे अचानक बाहेर गावी गेल्यामुळे फोनवर शुभेच्छा देवून आपल्या मागण्या बाबत पाठपुरावा करण्याचे त्यांनी आश्वासित केले. जिल्हाध्यक्ष संपतराव समिंदर, शहराध्यक्ष संजय मुनोत, महिला आघाडी अध्यक्षा श्रीमती आशाताई शिंदे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष वाळके अप्पा, नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, पाथर्डी तालुका प्रमुख साहेबराव वाघ, संगमनेर तालुकाध्यक्ष अशोक देशमुख, राहाता प्रमुख दशरथ पवार ,पारनेर तालुकाध्यक्ष यशवंत औटी, जामखेड प्रमुख शिवाजी थोरात राजुस्कर, अकोले प्रमुख बबनराव शेटे, नगर तालुका प्रमुख भिमराज भिसे, प्रकाश गायके, सखाहरी भोसले, बबनराव बारहाते,रामभाऊ तुपे, बशीर भाई शेख यांचेसह विविध तालुक्यातील पेन्शनर हजर होते. अहमदनगर शहर व पाथर्डी तालुक्यातील महिलाही हजर होत्या.
कार्यक्रमाचे उत्तम नियोजन त्र्यंबकराव देशमुख व त्यांच्या टीमने यांनी अतिशय परिश्रम घेवून यशस्वी केले. जिल्हाध्यक्ष समिंदर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.अशी माहिती जिल्हा अध्यक्ष संपतराव समिंदर यांनी दिली.
=================================
-----------------------------------------------
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳...शिरसगांव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment