राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Sunday, August 11, 2024

साहित्यिक अय्युब पठाण लोहगावकर यांना"महाराष्ट्र भूषण जीवन गौरव" पुरस्कार


- प्रतिनिधी - हारुन शेख - / पैठण -
बालभारतीच्या पाठयपुस्तकातील प्रसिद्ध कवी तथा "पाणपोईकार " अय्युब पठाण लोहगांवकर यांना नांदेड येथील "महात्मा कबीर समता परिषद, या संस्थेच्यावतीने २०२४ चा महाराष्ट्र भूषण जीवन गौरव पुरस्कार नुकताच जाहीर झाला असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी अय्युब पठाण यांना एका पत्राद्वारे कळविले आहे. बँन्डमास्टर ते शाळामास्तर व्हाया मराठी साहित्यिक असा जीवन प्रवास असलेले अय्युब पठाण यांनी मराठी साहित्य क्षेत्रात ३२ वर्षापासून साहित्य लेखनात भरीव योगदान दिलेले असून आजपर्यंत त्यांची बारा पुस्तके प्रकाशित झालेली आहे. तसेच २२ वर्षे लग्न-कार्यात बँन्डबाजा वाजवून समाजाचे मनोरंजन केले आहे. शैक्षणिक क्षेत्रात ३३ वर्ष सहशिक्षक म्हणून पवित्र अध्यापनाचे कार्य केले. तसेच " मुले रंगली काव्यात " या एकपात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे विविध शाळा- महाविद्यालयात १०५ प्रयोग सादर करून मुला-मुलींचे प्रबोधन केले आहे. अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या अशा अजोड कार्याची दखल घेऊन नांदेड येथील," महात्मा कबीर समता परिषदने श्री. पठाण यांना " महाराष्ट्र भूषण जीवन गौरव " पुरस्कार जाहीर केला आहे. 
या पुरस्कार निवड समितीमध्ये महाराष्ट्र राज्यभरातील विविध क्षेत्रातील तज्ञांनी मान्यवरांकडून श्री. पठाण यांची यांची पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्काराचे स्वरूप ताम्रपत्र, स्मृतिचिन्ह, मानाचा फेटा, सन्मानपत्र,आणि शाल- श्रीफळ व रोख रक्कम असे असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते अय्युब पठाण यांना,          " महाराष्ट्र भूषण जीवन गौरव " पुस्काराने गौरविण्यात येणार असल्याने साहित्यिक,
शैक्षणिक,सांस्कृतिक क्षेत्रासह विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================






No comments:

Post a Comment