- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
तालुक्यातील शिरसगांव येथे रविवारी मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अभियान प्रसंगी अहमदनगर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रतिपादन केले की, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचविणे हा आजचा उद्देश आहे.या वयोश्री योजनेत काही वयोवृद्ध आजारी असतात अपंग असतात,काहीना गुडघ्याचा त्रास असतो. डोळ्याचा त्रास असतो.अशा अनेक व्याधी असतात त्यासाठी त्यांना चष्मा, वॉकर,कंबर बेल्ट,कम्मोड खुर्ची,श्रवणयंत्र,व्हील चेअर आदी आवश्यक साहित्य घेण्यासाठी पैशाची कमतरता असते म्हणून शासनाची मदत म्हणून रु ३०००/-चे आर्थिक सहाय्य दिले जाते.त्यातून आवश्यक साहित्य घेता येईल.फोर्म भरताना नागरिकांनी ज्या बँकेला आधार लिंक केले आहे त्यांनी ते नमूद करावे.जे साहित्य घेतले त्याची पावती तलाठी यांचेकडे जमा करावी लागेल.तसेच दुसरी योजना आहे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना आहे त्यात वय ६० वर्षावरील महिला,पुरुष नागरिकांनी लाभ घायचा आहे.ज्यांना तीर्थ दर्शनासाठी जाणे शक्य नाही त्यांचेसाठी राज्य शासनाने ही योजना आणली आहे.त्याचा सुद्धा लाभ घेता येईल व तीर्थ दर्शन होईल.त्यासाठी रु ३००००/- ची तरतूद करण्यात आली आहे.आज शिबिरात ज्यांनी फॉर्म भरले आहेत. व ज्यांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत त्यांनी लवकर कामगार तलाठी, ग्रामपंचायत मध्ये जमा करावेत.मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेत ८ लाखापेक्षा जास्त फॉर्म भरण्यात आले आहेत.त्यांना पैसे खात्यावर जमा झाले आहेत.या योजनेसाठी ३१ ऑगस्ट मुदत आहे. नागरीकांनी सरकारी यंत्रणेकडूनच लाभ घ्यावा. शासनाच्या सर्व योजना आहेत त्याचा लाभ घ्यावा असेही ते म्हणाले.
यावेळी कामगार तलाठी शिरसगाव बाबासाहेब कदम यांनी ह्या योजनांची सविस्तर माहिती मार्गदर्शन केले.संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष गणेशराव मुद्गुले यानीही सांगितले की ग्रामपंचायत मार्फत शासनाच्या सर्व योजनाची माहिती वेळोवेळी देत असून त्याचा लाभ वेळेवर त्यांना मिळत आहे.आजच्या कॅम्पमध्ये ३१२ मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे व मुख्यमंत्री तीर्थ योजनचे १० फॉर्म सर्व कागदपत्रासह जमा झाले आहेत.त्यासाठी सेतूचालक संदीप जाधव,सह अनेक टेबलवर वैद्यकीय पथकासह जलद फोरम भरले गेले.
यावेळी शिरसगाव येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवरे, प्रांताधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ,नायब तहसीलदार गोसावी,सहा.गट विकास अधिकारी रमजान शेख, विस्तार अधिकारी चराटे, ठाकरे, कामगार तलाठी बाबासाहेब कदम,राजेंद्र घोरपडे, ग्रामविकास अधिकारी पी.पी. दर्शने, सरपंच राणीताई वाघमारे, उपसरपंच संजय यादव, ग्रा.प.सदस्य सुरेश मुद्गुले, शुभम ताके,महेश ताके,,सर्व ग्रा.प.सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्र संचालन व आभार प्रदर्शन प्रसन्ना धुमाळ यांनी केले.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - ✍️✅🇮🇳...शिरसगांव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment