समस्या जाणून घेण्यासाठी तीस वर्षांत प्रथमच मुख्याधिकारी मिल्लतनगर मध्ये
विविध नागरी समस्यांनी त्रस्त मिल्लतनगर वासियांच्या आगामी मोर्चा निवेदनचा इफेक्ट
विविध प्रसार माध्यमांच्या
रोखठोक बातम्यांची दखल
- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
येथील मिल्लतनगर सेक्टर ३ मध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात नेहमीच पावसाचे पाणी येथील नागरीकांच्या घरात शिरण्याची तशी ही जुणी समस्या आहे, याबाबत येथील त्रस्त नागरीकांनी अनेकवेळा श्रीरामपूर नगर पालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली, मात्र त्या मोबदल्यात मिळाली ती फक्त केवळ आश्वासने या वितरित कामे काही झाली नाही,अशा परिस्थितीत येथील रहिवाशांसाठी ही समस्या नित्याचीच म्हणून होईल कधी तरी कामे असे तब्बल तीस वर्ष उलटली गेली तरी नगर पालिका प्रशासनाने याकडे ढुंकूनही पाहीले नाही,
मात्र मागील आठवड्यात शहरात झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी मिल्लतनगर सेक्टर ३ मधीन नागरीकांच्या घरात शिरल्याने मिल्लतनगरच्या काही त्रस्त नागरीकांनी नगर पालिका प्रशासनास निवेदन देवून सदरील समस्या ह्या येत्या चार/ पाच दिवसात सोडवल्या गेल्या नाही तर दि. ०३ सप्टेंबर रोजी नगर पालिकेवर त्रस्त नागरीकांचा मोर्चा आणू असे निवेदन दिल्याने तात्काळ नगर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आणी आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी श्रीरामपूर नगर पालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे डायरेक्ट मिल्लतनगरमध्ये दाखल होत त्यांनी सदरील समस्यांबाबी तात्काळ आदेश देवून पावसाचे पाणी वाहून जाण्याकरीता तसेच मिल्लतनगरच्या विविध नागरी समस्यांचे निवारण करण्याकामी आदेश दिल्याने त्रस्त मिल्लतनगरवासियांच्या आशा पल्लवीत होवून समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिल्लतनगरची निर्मिती होवून तब्बल तीस वर्ष उलटली आहे, तशी याठिकाणची समस्याही तीस वर्षांची झाली आहे,मात्र अद्याप कोणत्याही मुख्याधिकाऱ्यांनी मिल्लतनगरवासियांच्या समस्यांची स्वतः पाहणी केली नव्हती वा कधी फिरकले देखील नव्हते,मात्र श्रीरामपूर नगर पालिकेचे सी ओ सोमनाथ जाधव हे खरोखरच एक कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी आहेत ज्यांनी प्रत्येक्ष पाहणीसाठी स्वतः वेळ काढून सदरील समस्यांची पाहणी केली आणी सदरील समस्यांबाबी तात्काळ आदेश देवून समस्या दुर करण्याकामी पुढाकार घेतला याबाबत मिल्लतनगरवासियांच्या वतीने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
परंतु यावेळी देखील आश्वासने देवून बोळवण केली गेल्यास मिल्लतनगरवासी नक्कीच येत्या ३ सप्टेंबर च्या नगर पालिकेवरील मोर्च्यावर ठाम असल्याने मिल्लतनगरवासियांच्या नेहमीच्या या समस्यांचे निराकरण करणे भाग पडणार असल्याने सदरील समस्यांचे खरच निराकरण होते का हे पाहणे देखील मोठे औत्सुक्याचे ठरणार आहे.
=================================
-----------------------------------------------
*संकलन*✍️✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
:- राज प्रसारित Blog Spot.Com Sociel Mediya Google Network 💐✅🇮🇳...
Mobile +919730595775...
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment