राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 28, 2024

संत मदर तेरेसा अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या थोर समाज सेविका - करण ससाणे


- श्रीरामपूर - प्रतिनिधी - / वार्ता -
संत मदर तेरेसा या अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या थोर समाजसेविका होत्या असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी केले.
श्रीरामपूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित संत मदर तेरेसा यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी ससाणे बोलत होते. ससाणे पुढे म्हणाले की मदर तेरेसा यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी असून त्यांनी आपले संपूर्ण जीवन मानवसेवेसाठी समर्पित केले. मदर तेरेसा या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी खरोखर प्रेरणास्थान असून अनेक अनाथालय, आश्रम व रुग्णालयांच्या माध्यमातून त्यांनी लोकांची सेवा केली. संत मदर तेरेसा यांनी बेघर, गरीब आणि गरजवंतांना आपलंसं करून त्यांना आधार दिला. संत मदर तेरेसा यांनी भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये देखील मिशनरी ऑफ चॅरिटी या संस्थेचा विस्तार केला. त्यांनी अनाथ मुले, गरीब,पीडित व असाह्य वृद्धांची सेवा करत लोकांना खऱ्या अर्थाने निस्वार्थी भावनेने जगण्याची नवी प्रेरणा दिली. संत मदर तेरेसा यांच्या महान कार्याची दखल घेत त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, माजी नगरसेवक रितेश रोटे, दत्तात्रय सानप, नागेशभाई सावंत, प्रवीण नवले, डॉ. राजेंद्र लोंढे, सुरेश ठुबे, जावेद शेख, रियाजखान पठाण, नवाज जहागीरदार, निलेश भालेराव, जगताप साहेब, बाबा वायदंडे, लेविन भोसले, संजय गोसावी, रितेश गिरमे, राजेश जोंधळे, अक्षय जोंधळे, कुंदनसिंग जुनी, लोयला सदन चर्च चे प्रमुख धर्मगुरू प्रकाश भालेराव, ललित गायकवाड, विजय त्रिभुवन, संत लुक हॉस्पिटलच्या सिस्टर रिटा, सिस्टर जॅकलीन,सिस्टर ज्योती, माधुरी शिनगारे, तेरीजा तेलोरे, हर्षदा फुलपगार आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग* 
पत्रकार अफजल मेमन - ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर 
-----------------------------------------------
=================================

=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================


No comments:

Post a Comment