- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
श्रीरामपूर येथे नव स्वराज्य सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी किरण सावंत पाटील यांना निवेदन देण्यात आले.यानिवेदनात असे म्हटले आहे की,
दिनांक १५/०८/२०२४ रोजी पश्चिम बंगाल येथे झालेल्या डॉक्टर महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व दिनांक १९/०८/२०२४ रोजी बदलापूर जिल्हा ठाणे येथे चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केलेल्या दोन्ही घटनेच्या आरोपीला कठोर शासन होऊन त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नव स्वराज्य सेनेच्या वतीने करण्यात आली व संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. ही घटना अतिशय निंदनीय अमानुष असून मानव जातीला काळीमा फासणारी आहे. देशांमध्ये व राज्यात लहान मुली व महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे आता थांबले पाहिजे, आरोपीला कायद्याची दहशत असावी म्हणून या आरोपीला तात्काळ कठोर शिक्षा व्हावी तसेच भविष्यात अशा घटना होऊ नये याची प्रशासनाने काळजी घ्यावी असेही या निवेदनात म्हटले आहे यावेळी नव स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयराव खाजेकर, प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद मीर असगर अली, प्रदेश महासचिव दशरथ भोंगळे ,राज्य अध्यक्ष एकलव्य संघटना शिवाजीराव गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष एकलव्य संघटना सुदाम मोरे ,तालुका संघटक सचिव विठ्ठल विघावे, तालुका सौरक्षण प्रमुख रंगनाथ पितळे , शाखाध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद, शाखा उपाध्यक्ष संपत मोरे, शाखा अध्यक्ष किरण मिसाळ, जिल्हा अध्यक्ष महिला पूनम जाधव, प्रदेशाध्यक्ष महिला रमाताई भालेराव, शाखा अध्यक्ष परविन शहा शहराध्यक्ष महिला शितलताई गोरे, करीना गायकवाड, हेमंत मुसमाडे, प्रदेश अध्यक्ष शीख मोर्चा अमर प्रीत सिंग सेठी, शाखा अध्यक्ष सविता रणदिवे, संघटक सचिव समीना शेख, आकाश कांबळे, शोभाताई पातारे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे- ✍️✅🇮🇳...शिरसगांव
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर +919561174111
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment