राज प्रसारित इलेक्ट्रॉनिक सोशल मिडिया नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे प्रकाशित होणारे समाचार विशेष स्वरूपातिल राजकीय राष्ट्रीय पर राष्ट्रीय व शासकीय निम्म शासकीय घडामोडी विषय वार्ता प्रदर्शित - वृत्त सेवा तसेंच अन्याय अत्याचार अफरा तफर निर्भीड पने प्रसारण करणारे मराठी भाषातिल प्रसारित होणारे वार्ता पत्र आपल्या परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या घडामोडी साठी संपर्क करा ☎️ +919730 595 775

Wednesday, August 28, 2024

मिल्लतनगर च्या नागरी समस्या तातडीने मार्गी लावू - मुख्याधिकारी जाधव


- श्रीरामपूर - (प्रतिनिधी) - वार्ता -
शहरातील मिल्लत नगर या उपनगरातील फेल झालेली ड्रेनेज सिस्टीम व रस्त्यावर साचणारे पाणी तसेच गतिरोधक,मिल्लत नगर ट्रॅकची सफाई ही कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी या भागातील पाहणीनंतर पालिकेच्या विविध विभागांना दिले.भुयारी गटारीचा प्रश्न न्यायप्रविष्ठ असल्याने त्यात मला पडायचे नाही असे सांगून या भागातील ड्रेनेजची सफाई करून तुंबलेले पाणी तातडीने काढून देण्याबाबत आरोग्य खात्यामार्फत लगेच कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
मागील दोन-तीन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे मिळत नगर मधील सेक्टर तीन चार पाच मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी लोकांच्या घरात शिरले होते तसेच या भागातील भुयारी गटार चोकअप झाल्याने तेथील महिला मिश्रित पाणी हे नागरिकांच्या घरात आले होते. याबाबत या भागातील नागरिकांनी सोमवारी आमदार लहुजी कानडे व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांची भेट घेऊन आपली गाऱ्हाणी मांडली.
आमदार कानडे यांनी सुद्धा फोन करून या प्रश्नात लक्ष घालण्याचे मुख्याधिकाऱ्यांना सांगितले होते. त्यावर मी स्वतः त्या भागात येऊन पाहणी करतो व हे प्रश्न सोडवतो असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळास दिले होते. त्याप्रमाणे काल दुपारी मुख्याधिकारी जाधव, नगर अभियंता गवळी, आरोग्यनिरीक्षक संजय आरणे, संजय शेळके व त्यांचे इतर सर्व कर्मचाऱ्यांच्या टीमने मिल्लत नगर भागात भेट देऊन दोन तास पाहणी केली.यावेळी या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.चर्च रोडवर गतिरोधक बसविणे तसेच या रोडवरील भुयारी गटारीचे सर्व चेंबर स्वच्छ करून नागरिकांच्या घरात जाणारे पाणी काढून देण्याचे आदेश त्यांनी आरोग्य विभागास दिले. त्याचबरोबर पाण्याचा तलाव,तेथील सांडपाण्याचा नाला,मिल्लत मशिदी समोरील रस्ता,वैदू वाडा पुलावर कॅनलला पडलेला भगदाड याची ही त्यांनी पाहणी केली.या समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेला तातडीने काम सुरू करण्याचे आदेश दिले.
यावेळी या भागातील नागरिक सर्वश्री.जेष्ठ पत्रकार सलीमखान पठाण,सय्यद जाकीर हुसेन,शौकत शेख, युसूफ लाखानी,सलीम रसूल पटेल,समीरखान पठाण,हाजी युसुफभाई सय्यद,सज्जाद नवाब,अफरोज शाह,रुकसाना शाह,फिरोज पठाण साबुन वाले,अमीर मिर्झा,असलम बिनसाद, गनी पिंजारी,इम्रान शेख आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या भागातील नागरी समस्यांकडे आत्तापर्यंत सातत्याने नगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे.गेले तीन दिवस पावसाचे पाणी लोकांच्या घरात आहे.परंतु पालिकेने त्याची दखल घेतली नाही याबद्दल नागरिकांनी तीव्र नाराजी मुख्याधिकार्‍याजवळ व्यक्त केली.परिस्थितीचे गांभीर्य पाहून या भागात तातडीने स्वच्छता करण्यात येईल तसेच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील असे आश्वासनही मुख्याधिकारी जाधव यांनी दिले.


मिल्लतनगरला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी
मिल्लत नगर परिसरातील नागरी वसाहतीला आता तीस वर्षे पूर्ण झाली आहेत. या भागातील प्रश्नांसंदर्भात नागरिक वेळोवेळी नगरपालिकेकडे तक्रारी करतात.मात्र त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.परंतु परवा नागरिकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना नागरी समस्यांचे गांभीर्य लक्षात आणून दिल्याने मुख्याधिकारी जाधव यांनी तातडीने या भागास भेट देण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे काल त्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेसह या भागाची पाहणी केली. त्यामुळे मिल्लत नगर भागाला भेट देणारे पहिले मुख्याधिकारी म्हणून सोमनाथ जाधव यांची नोंद झाल्याचे म्हणत नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.


=================================
-----------------------------------------------
जनाब सलीम भाई पठाण जेष्ठ पत्रकार- ✍️✅🇮🇳... श्रीरामपूर  +919226408086
-----------------------------------------------
=================================

No comments:

Post a Comment