- श्रीरामपूर - प्रतिनिधी -/ वार्ता -
भंडारदरा व मुळा धरणाच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीभान टेलटॅंक, मुठेवडगांव, मुसळवाडी तलाव, गावतळे, बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत, अशा सूचना आमदार लहू कानडे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांना दिल्या आहेत.
जून व जुलै महिन्यात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीभान टेलटॅंक, मुसळवाडी व मुठेवडगाव तलाव तसेच पाणी योजनांचे गावतळे, बंधारे व पाझर तलाव यांची पाण्याची पातळी खालावली आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने भंडारदरा, निळवंडे तसेच मुळा व गोदावरी नदीत ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी जायकवाडी धरणात जात आहे. जायकवाडी धरणातही पुरेसा पाणीसाठा झाला आहे.
सध्या भंडारदरा, मुळा व नांदूर मध्यमेश्वर धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी प्रवरा, मुळा व गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून टाकळीभान टेलटॅंक, मुठेवडगाव तलाव, मुसळवाडी (ता. राहुरी) तलाव तसेच गावोगावचे पाझर तलाव, पाणी योजनांचे गावतळे व बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी मतदारसंघातील शेतकरी व ग्रामस्थांनी आ. कानडे यांच्याकडे केली आहे.
बंधारे, गावतळे, पाझर तलाव भरून घेतल्यास परिसरातील पाणी पातळीही वाढणार असल्याने शेती, जनावरे व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात दूर होणार आहे. त्यामुळे ओव्हरफ्लोच्या पाण्यातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील टाकळीभान टेलटॅंक, मुठेवडगाव, मुसळवाडी तलाव, गावतळे, बंधारे, पाझर तलाव भरून द्यावेत, अशा सूचना आ. कानडे यांनी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे यांना दिल्या आहेत.-
=================================
-----------------------------------------------
*वृत्त विशेष सहयोग*
पत्रकार दिपक कदम, ✍️✅🇮🇳...श्रीरामपूर
-----------------------------------------------
=================================
=================================
-----------------------------------------------
*संकलन*💐✅🇮🇳...
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर ±९१९५६११७४१११
-----------------------------------------------
=================================
No comments:
Post a Comment